Firearms Laws: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद संपू्र्ण राज्यात उमटले आहेत. या घटनेच्या निषेर्धात सर्वपक्षीय नेत्यांनी बीडमध्ये मोर्चा काढला होता. तसेच या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशीही त्यांनी मागणी केली. बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. यावरून विरोधकांनी घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री यांनी बंदुकी सोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत त्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले.या पार्श्वभूमीवर बंदुकीसाठी परवाना कसा मिळतोय? त्यासाठी नेमके काय निकष असतात? कोणाला बंदूक वापरण्याचा परवाना दिला जातो? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती बंदूक परवानाधारक आहेत? याबाबत महत्त्वाची महिती जाणून घेऊयात.
दरम्यान, पोलीस दल किंवा सैन्य दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांना बंदूक परवाना दिला जातो. मात्र, हा परवाना देण्याबाबत विभाग प्रमुखाचे स्वयंस्पष्ट अभिप्रायासह असलेले ना-हरकत किंवा शिफारस पत्र देणं बंधनकारक असते. तरच, बंदूक परवाना मिळू शकतो. याशिवाय, ज्या व्यक्तीच्या जावीला धोका आहे, अर्ज करण्यापूर्वी त्याच्यावर प्रत्यक्ष हल्ला झाला आहे किंवा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे, तो व्यक्ती बंदूक परवाना मिळवू शकतो. परंतु, त्या व्यक्तीला अर्ज करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद द्यावी लागले आणि त्याची प्रत अर्जासोबत जोडवी लागेल.
याशिवाय, जंगली प्राण्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठीही बंदूक परवाना मिळतो. पण त्यासाठी अर्जदाराला चालू वर्षा ७/१२ उतारा आणि ८ 'अ' चा अद्यावत उतारा सादर करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नेमबाज खेळाडूलाही बंदूक परवाना मिळवता येऊ शकतो. मात्र, त्यासाठी संबंधित खेळाडूला मागील २ वर्षात नेमबाज स्पर्धेत सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र जोडावे लागते. हे प्रमाणपत्र सर्टिफाईंग बॉडीने प्रमाणित केलेले असावे. तसेच ज्याठिकाणी सराव करतात, त्या क्लबचे ओळखपत्र किंवा मेंबरशिप कार्ड अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे.
- अर्जदार सर्वात प्रथम भारतीय असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय २१ वर्ष पूर्ण असणे बंधनकारक आहे.
- अर्जदाराला कुठल्याही गुन्ह्यात अटक, शिक्षा झालेली नसावी आणि कुठल्याही कोर्टात प्रकरण प्रलंबित नसावे.
- खेळाडूंना १२ वर्षी शस्त्र परवाना मिळू शकतो, पण कायदेशीर परवाना असलेल्या व्यक्तीच्या पस्थितीतच प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे.
बीडमधील गुन्हेगारीच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. दिवसाढवळ्या गोळीबार केला जात आहे. तर, अनेक ठिकाणी बंदुकीचा धाक दाखवून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
संबंधित बातम्या