how to check voter list by name : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. १९ एप्रिल ते ४ जून या कालावधीत होणाऱ्या निवडणुकांबाबत मतदारांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या वर्षी ९७ कोटी नगगरीक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्रासह निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. ही यादी वेळोवेळी बदलत राहते. अशा परिस्थितीत मतदानासाठी केवळ मतदार ओळखपत्र पुरेसं ठरणार नाही. त्यामुळे तुमचे नाव यादीत आहे की नाही हे तपासून घ्यावे लागणार आहे.
मतदानाचा हक्क बाजवण्यासाठी मतदार यादीत नाव नोंदवले असणे महत्त्वाचे आहे. जर मतदार यादीत नाव नसेल तर मतदान करता येणार नाही. तुमचे नाव या यादीत आहे की नाही हे तुम्ही सहजपणे ऑनलाइन तपासू शकता. या साठी खालील पद्धती अवलंबवा.
यादीतील नाव तपासण्यासाठी तुमच्याकडे जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघासह ईपीआयसी क्रमांक, नाव, वय, जन्मतारीख यांचा तपशील असावा.
आता फोन, लॅपटॉप किंवा संगणकावरून कोणत्याही ब्राउझरच्या मदतीने https://electoralsearch.eci.gov.in/ वर जा.
निवडणूक यादीतील नाव शोधण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी कोणताही एक निवडा. येथे तुम्हाला तीन पर्याय मिळतील:
अ) तपशिलानुसार शोधा- तपशिलानुसार शोधण्यासाठी, तुम्हाला नाव आणि जन्मतारीखांसह काही माहिती द्यावी लागेल. यानंतर, येथे दिलेला कॅप्चा प्रविष्ट करा आणि शोध बटणावर टॅप करा.
ब) ईपीआयसी द्वारे शोधा : यासाठी, भाषा निवडल्यानंतर, तुम्हाला मतदार आयडीवर दिलेल्या ईपीआयसी क्रमांकासह राज्य आणि कॅप्चा प्रविष्ट करावा लागेल आणि शोध बटणावर टॅप करावे लागेल.
क) मोबाईलद्वारे शोधा- यासाठी राज्य आणि भाषा निवडा. यानंतर, मतदार ओळखपत्रासह नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि कॅप्चा प्रविष्ट करा आणि शोध वर टॅप करा.
यापैकी कोणताही पर्याय वापरून तुम्ही मतदार यादीत तुमचे नाव तपासू शकता. तुम्ही यादीतील तुमचे नाव आणि मतदार ओळखपत्रासह मतदान करू शकता.