SPI Aurangabad and Nashik Admission 2024 : महाराष्ट्रातील मुले आणि मुलींना संरक्षण दलात अधिकारी म्हणून भरती व्हावी या साठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शासानाने छत्रपती संभाजीनगर येथे मुलांसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था आणि नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था स्थापन करण्यात केली आहे. या ठिकाणी २०२४ ची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक तरुणांना लष्करभरती प्रशिक्षणासाठी या ठिकाणी प्रवेश घेण्याची सुवर्ण संधी आहे. पुढील पद्धतीने या ठिकाणी अर्ज करता येणार आहे.
जून २०२४ पासून छत्रपती संभाजीनगर मुलांच्या सेवा संस्था प्रवेशाच्या ४८ व्या कोर्ससाठी तर आणि मुलींसाठी नाशिक येथे दुसरा कोर्स प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
या ठिकाणी प्रवेशासाठी अविवाहित असणे ही अट असून महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातील बिदर, बेळगावी आणि कारवार जिल्ह्यांतील मुले आणि मुली या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी पात्र आहेत. या साठी ०२ जानेवारी २००७ आणि ०१ जानेवारी २०१० दरम्यान जन्म तारीख असणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. उमेदवाराने मार्च/एप्रिल/मे २०१४ मध्ये राज्य मंडळाकडून १० वी किंवा समकक्ष परीक्षेला उत्तीर्ण केली असावी. तर मार्च/एप्रिल/ मे २०२४ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेला बसणारा/ बसणारी व जून-२०२४ मध्ये इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा.
सैन्यदलात अधिकारी बनन्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी पात्र असावा. UPSC ने NDA आणि INA साठी दिलेल्या शारीरिक सर्व निकषांस उमेदवार हा पात्र असावा. हे निकष UPSC तथा संस्थेच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. काही प्रमुख निकष उंची – १५७ सें. मी. वजन ४३ कि.ग्रा. छाती न फुगवता ७४ सें.मी. फुगवून- ७९ सें.मी., रातांधळा किंवा रंगांधळेपणा नसावा. NDA/ INA प्रवेशासाठी UPSC च्या अधिसूचनेनुसार डोळ्यांची क्षमता असावी अशी अट आहे.
पात्र उमेदवारांना २८ एप्रिल २०४ रोजी विविध केंद्रांवर लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असून प्रश्नपत्रिका ही इंग्रजीत भाषेत असेल. ही परीक्षा ६०० गुणांची असून यात १५० प्रश्न राहतील यातील गणितावर आधारित ७५ प्रश्न तर सामान्य ज्ञानावर आधारित ७५ प्रश्न असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी ४ गुण आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी वजा १ गुण दिला जाणार आहे. लेखी परीक्षा सामान्यत: राज्य बोर्ड आणि सीबीएसई इयत्ता ८ ते १० च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
मुलांसाठी ऑनलाइन अर्ज www.spiaurangabad.com या वेबसाइटवर उपलब्ध आहेत आणि मुलींसाठी ऑनलाइन अर्ज www.girlspinashik.com वर उपलब्ध आहेत. परीक्षा शुल्क रु. ४५० रुपये राहणार असून ते परत मिळणार नाही. ही परीक्षा शुल्क क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे उमेदवारांना भरता येणार आहे. तसेच डीडी किंवा चलन स्वीकारले जाणार नाही. अटी व शर्तींनुसार अर्ज भरला नाही तर अर्ज नाकारला जाईल आणि भरलेली फी परत केली जाणार नाही यादी नोंद उमेदवारांनी घ्यावी. या साठी अर्ज करण्याची तारीख ही २९ फेब्रुवारी २०२४ ही आहे.
परीक्षेचे हॉल तिकीट हे वर दिलेल्या वेबसाइटवरून १० एप्रिल २०२४ रोजी नंतर डाउनलोड करता येणार आहे. अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी www.spiaurangabad या संकेतस्थळावर भेट द्यावी तर मुलींनी www.girlspinashik.com या वेबसाईटला भेट द्यावी. परीक्षेशी संबंधित सर्व सूचना या वेबसाइटवरच प्रसिद्ध केल्या जातील.