New Year Celebration : राज्यात नवीन वर्ष व नाताळ सण जल्लोषात साजरे केले जाणार आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी उत्सुक असलेल्यांसाठी एक खुशखबर आहे. न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी पुण्यासह मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट व क्लब यांना पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नाताळाच्या दिवशी व ३१ तारखेच्या रात्री पहाटे पर्यंत तरुणाईला सेलिब्रेशन करता येणार आहे. या साठी चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात येणार आहे.
उद्या नाताळ सण व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहे. या साठी शहरात झगमगाट व रोषनाई देखील करण्यात आली आहे. हॉटेल मॉलमध्ये तयारी करण्यात आली आहे. या निमित्त राज्यातील खाद्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, परमीट रूम व ऑर्केस्ट्रा बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी दिली आहे. ही परवानगी आज २४, २५ आणि ३१ डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत लागू असेल. हॉटेल आणि बार सुरू ठेवण्यासाठी इंडियन हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी यांनी १० डिसेंबर रोजी शासनाकडे या संदर्भात विनंती केली होती. त्यानुसार राज्य शासनाने नाताळ व नववर्षाच्या दिवशी हॉटेल पहाटे पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
हॉटेल, बार, पब व खाद्यगृह सुरू ठेवण्यासाठी हॉटेल चालकांना परवानगी देण्यात आली असली तर काही नियमांचे पालन हॉटेल व्यावसायिकांना करावे लागणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्थानिक प्रशासनाकडून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त शहरात तैनात केला जाणार आहे. दरम्यान, प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. मद्यपान करून वाहन चालवल्यास कारवाई देखील केली जाणार आहे.
पुण्यात नाताळ आणि नवीन वर्ष जल्लोषात साजरे केले जाते. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज, एमजीरोड कॅम्प परिसर, बाणेर येथे नवीन वर्ष जल्लोषात साजरे केले जाते. या वर्षी देखील येथे होणारी गर्दी पाहता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. नागरिकांनी देखील आनंद साजरा करताना काळजी घेण्याचे व नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, हॉटेल, बार व पबला वाढीव वेळ दिल्याने नवीन वर्ष जल्लोषात साजरे केले जाणार आहे.
संबंधित बातम्या