hot summer in Maharashtra in this year : राज्यात या वर्षी विविध भागात उष्णतेची (Maharashtra summer season) लाट येणार आहे. वाढत्या उन्हामुळे राज्य यावर्षी होरपळणार आहे. बहुतांश जिल्ह्यातील तापमानात देखील मोठी वाढ नोंदवली जाण्याची शक्यता आहे. मार्च ते मे दरम्यानचा काळात हे उष्णतमान (heat waves) वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने शुक्रवारी वर्तविला.
भारतीय हवामान खाते आणि केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयातर्फे २०१६ पासून प्रत्येक ऋतूच्या सुरुवातील हवामान अंदाज वर्तविण्यात येतो. ‘मल्टी मॉडेल एन्सेम्बल’च्या (एमएमई) आधारावर हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या साठी देश आणि विदेशातील हवामान संस्था आणि संशोधन केंद्रांनी विकसित केलेल्या विविध प्रारुपांच्या आधार घेण्यात असून यात ‘मॉन्सून मिशन क्लायमेट फोरकास्ट सिस्टिम’ (एमएमसीएफएस) याचाही समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, या वर्षी मार्च ते मे या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात उष्णतामान वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शुक्रवारी या संदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या बाबत माहिती देण्यात आली.
राज्याच्या या वर्षी मोठ्या प्रमाणात उष्णतामान राहणार आहे. या मार्च महिन्यात तापमानात वाढ होण्यास सुरुवात होणार आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ होणार आहे. या वर्षी मार्च ते मे दरम्यान, येणाऱ्या उष्णतेच्या लाटा या जास्त राहणार आहेत. ओरिसा आणि त्याच्या जवळच्या भागात उष्णतेच्या लाटा येतील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. यामुळे यावर्षीचा उन्हाळा देशातील नागरिकांना होरपळून काढणारा ठरणार आहे. ईशान्य भारत, पश्चिम हिमालय क्षेत्र, दक्षिणेकडील राज्यांचा काही भाग पश्चिम किनाऱ्यावर तुलनेने तापमान हे कमी राहणार आहे. यामुळे येथील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
या वर्षी देशात मार्च महिन्यात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद या वर्षी होईल असा अंदाज आहे. १९७१ ते २०२० या दरम्यान पडलेल्या पावसाच्या आधारे देशात मार्चमध्ये २९.९ मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. मात्र, या वर्षी मार्च महिन्यात त्या पेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता केंद्रीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याचा प्रवाह असलेल्या एन निनोची सद्यःस्थितीवर विविध हवामान संस्थांकडून माहिती देखील संकलित करण्यात आली आहे. त्यानुसार विषुवृत्तावरील प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. मात्र, येणाऱ्या काळात एन निनोचा प्रभाव कमी होऊन सामान्य होण्याची शक्यता आहे.
- ईशान्य भारत, मध्य आणि द्वीपकल्पाच्या भागात कमाल तापमान सामान्य ते सामान्यपेक्षा कमी नोंदले जाईल.
- किमान तापमानाचा पारा संपूर्ण देशात सरासरीपेक्षा जास्त नोंदण्याची शक्यता वर्तविण्यात आली.
-देशात मार्च ते मे या दरम्यान कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा जास्त असेल. देशाच्या ईशान्येकडील राज्य वगळता बहुतांश ठिकाणी उन्हाचे प्रमाण वाढणार आहे.
भारतीय द्वीपकल्प, ईशान्येकडील राज्ये आणि पश्चिम मध्य भागात बहुतांश ठिकाणी कमाल सरासरीपेक्षा जास्त नोंदले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे मार्चमध्ये उन्हाचा चटका वाढेल. पूर्वेकडील राज्य, देशाचा पूर्वमध्य भाग आणि वायव्य भारतातील काही भागांमध्ये कमाल तापमान सामान्य ते सामान्यापेक्षा कमी नोंदले जाण्याची शक्यता वर्तविली आहे. हिमालयाचा भाग वगळता उर्वरित देशातील बहुतांश भागात मार्चमध्ये किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा जास्त नोंदला जाईल.