Mumbai news : हॉस्पिटलमध्ये आता फूड डिलिव्हरी बॉयला नो एंट्री, ऑर्डर स्वीकारण्यासाठी प्रवेशद्वारावर जावे लागणार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai news : हॉस्पिटलमध्ये आता फूड डिलिव्हरी बॉयला नो एंट्री, ऑर्डर स्वीकारण्यासाठी प्रवेशद्वारावर जावे लागणार

Mumbai news : हॉस्पिटलमध्ये आता फूड डिलिव्हरी बॉयला नो एंट्री, ऑर्डर स्वीकारण्यासाठी प्रवेशद्वारावर जावे लागणार

Published Aug 19, 2024 10:55 AM IST

No entry for delivery boy in hospitl and hostel : कोलकाता घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयात व हॉस्टेलमध्ये डिलिव्हरी बॉयला बंदी घालण्यात आली आहे.

हॉस्पिटलमध्ये आता फूड डिलिव्हरी बॉयला नो एंट्री, ऑर्डर स्वीकारण्यासाठी प्रवेशद्वारावर जावे लागणार
हॉस्पिटलमध्ये आता फूड डिलिव्हरी बॉयला नो एंट्री, ऑर्डर स्वीकारण्यासाठी प्रवेशद्वारावर जावे लागणार (PTI)

No entry for delivery boy in hospitl and hostel in Mumbai : कोलकता येथील घटनेमुळे निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या दवाखान्यात व मुलींच्या हॉस्टेलमध्ये डिलिव्हरी बॉयना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. जर पार्सल द्यायचे झाल्यास हॉस्टेल तसेच दवाखान्याच्या प्रवेशद्वारावर द्यावे लागणार आहे. या निर्णयामुळे खाद्यपदार्थांची ऑर्डर केल्यास ते आता मुख्य प्रवेशद्वारावर जाऊन घ्यावे लागणार आहे.

कोलकता येथील घटनेचे संपूर्ण देशात पडसाद उमटले आहेत. डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या मुळे मुंबई पालिकेने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. महापालिका प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. नीलम अंड्राडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गोहन जोशी व मुख्य सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. या सोबतच रुग्णालयातील असुरक्षित जागा शोधणे, व ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची गरज आहे त्या ठिकाणी ती निश्चित करणे या विषयांवर चर्चा झाली.

दवाखानेत व हॉस्टेलमध्ये अनेक डॉक्टर हे बाहेरून जेवण मागवत असतात. त्यामुळे डिलिव्हरी बॉय यांचे दवाखान्याच्या परिसरात सारखे येणे जाणे असते. हे डिलिव्हरी बॉय थेट रुग्णालय व वसतिगृहात ये जा करत असतात. दवाखान्याच्या व डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे धोक्याचे असल्याने यापुढे पालिकेच्या दवाखान्यात व हॉस्टेलमध्ये डिलिव्हरी बॉयला प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

दवाखान्याच्या वाहनतळातदेखील आता बाहेरच्या वाहनांना प्रवेश नाकारला जाणार आहे. दवाखान्याच्या पार्किमध्ये डॉक्टरांची वाहने सोडून इतर वाहने जास्त राहत असल्याने कर्मचाऱ्यांच्या व डॉक्टरांच्या वाहनांना स्टिकर दिले जाणार असून बाहेरील वाहनांना प्रवेश नाकारला जाणार आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांना मिळणार व्हिजिटर पास

महापालिकेचे रुग्णालय रुग्णाबरोबर अनेक नातेवाईक येत असतात. या मुळे रुग्णालयात मोठी गर्दी होते. ही गर्दी कमी करण्यासाठी रुग्णालयात व्हिजिटर पासची दिला जाणार आहे. रुग्णाला भेटीची वेळ देखील निश्चित केली जाणार आहे. यामुळे दवाखान्यातील गैरप्रकारांना चाप बसणार आहे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर