Honey bee attack in Nive : पोलादपुर जवळील नीवे येथे वडाची पूजा करताना महिलांवर मधमाशांचा हल्ला; ११ महिला गंभीर-honey bee attack on woman in raigad nive while worshiping 11 women seriously injured ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Honey bee attack in Nive : पोलादपुर जवळील नीवे येथे वडाची पूजा करताना महिलांवर मधमाशांचा हल्ला; ११ महिला गंभीर

Honey bee attack in Nive : पोलादपुर जवळील नीवे येथे वडाची पूजा करताना महिलांवर मधमाशांचा हल्ला; ११ महिला गंभीर

Jun 22, 2024 09:42 AM IST

Honey bee attack in Nive : रायगड जिल्ह्यातील पोलादपुर तालुक्यातील नीवे येथे वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा करण्यासाठी गेलेल्या महिलांवर मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात काही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

पोलादपुर जवळील नीवे येथे वडाची पूजा करताना महिलांवर मधमाशांचा हल्ला; ११ महिला गंभीर
पोलादपुर जवळील नीवे येथे वडाची पूजा करताना महिलांवर मधमाशांचा हल्ला; ११ महिला गंभीर

Honey bee attack in Nive : शुक्रवारी संपूर्ण राज्यात वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांनी वडाला सात फेरे मारून पूजा करून आपल्या पतीसाठी दीर्घ आयुष्य मागितले. मात्र, रायगड जिल्ह्यातील पोलादपुर तालुक्यातील नीवे येथे वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा करण्यासाठी गेलेल्या महिलांवर मधमाशांनी हल्ला केला.

या हल्ल्यात ११ महिला व एक पुरुष हा गंभीर जखमी झाला आहे. अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने गोंधळ उडाला होता. आपला बचाव करण्यासाठी येथे आलेल्या महिला आणि आजूबाजूचे लोक सैरावैरा पळू लागले होते. ही घटना शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास घडली.

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यामधील चांभारगणी ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील निवे गावातील एका वटवृक्षाखाली सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पाच-सहा महिला या पूजा करण्यासाठी जमल्या होत्या. काहींच्या पूजा झाल्यावर आणखी चार-पाच जणी वटवृक्षाजवळ पूजेसाठी आल्या. सर्वांचे पूजाविधी झाल्यानंतर नारळ फोडण्यासाठी या महिलांनी जवळच्या शेतात काम करणाऱ्या अनंत नाना तळेकर यांना बोलावून घेतले. तळेकर तिथे पोहोचल्यानंतर अचानक जवळच्या झाडावरील मधमाशांचे मोहोळ उठले आणि मधमाशांनी महिलांसह तळेकर यांनाही डंख मारले.

अचानक मधमाशांनी केलेल्या हल्ल्यामुळे येथे जमलेल्या महिला व आजू बाजूचे नागरिक सैरावैरा पळू लागले. यावेळी मधमाशांनी अनेकांना डंख मारले. यामुळे काही महिला या घटनेत गंभीर जखमी झाल्या. येथे आलेल्या ११ महिला व एक पुरुष या घटनेत जखमी झाले. यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. मधमाशांनी मारलेल्या डंखामुले महिलांना त्रास होऊ लागला. यातील काही महिलांची प्रकृती ही गंभीर आहे. डॉक्टरांनी उपचार सुरू केले आहेत. यातील काही महिलांची प्रकृती ही स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. येथील काही नागरिक व महिला यांनी जवळ असणाऱ्या एका घरात आसरा घेतल्याने सुदैवाने मधमाशांच्या हल्ल्यातून त्या बाचावल्या.

Whats_app_banner
विभाग