Holiday Announcement In Mumbai : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत दरवर्षी चैत्यभूमीवर भीम अनुयायी येत असतात. या वर्षी शुक्रवारी महापरिनिर्वाण दिवस असून मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यामुळे त्यांना चैत्यभूमी येथे जाता यावे यासाठी प्रशासनाने अनेक उपाय योजना केल्या आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईतील शिवाजी पार्क येथे चैत्यभूमी असून या ठिकाणी महापरिनिर्वाण दिनी मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी दरवर्षी येत असतात. या वर्षी देखील मोठ्या संख्येने भीम अनुयायी मुंबईत येणार आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त केलेल्या सोयीसुविधांचा आढावा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला आहे. या सोबतच हेलिकॉप्टरमधून चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी करण्याचे नियोजन देखील करण्यात आले आहे. नागरिकांच्या सोईसाठी रेल्वे स्थानक, बस स्थानके या ठिकाणी मदत कक्ष उभारण्यात येणार आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणात नागरिक येणार असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये या साठी मुंबईकरांना शुक्रवारी महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी ४ ते ७ डिसेंबर दरम्यान बेस्टने विशेष बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. दादर रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमीपर्यंत दर १५ ते २० मिनिटांनी बस सोडण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी मध्यरात्री विशेष लोकल धावणार आहेत. यात परळ-कल्याण व कुर्ला-पनवेल स्थानकांदरम्यान १२ लोकल चालवल्या जाणार आहेत. या गाड्यांना सर्व स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'बेस्ट'चा बेस्ट निर्णय; दादरहून दर १५ मिनिटाला बस सुटणार
संबंधित बातम्या