मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Holi Special Train : होळीसाठी घरी जायचंय तर तिकिटाचं टेन्शन नको! मध्य रेल्वे चालवणार २ अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्या

Holi Special Train : होळीसाठी घरी जायचंय तर तिकिटाचं टेन्शन नको! मध्य रेल्वे चालवणार २ अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्या

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 22, 2024 09:44 PM IST

Holi Special Unreserved Trains : मध्य रेल्वेने होळीसाठी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन दोन अतिरिक्त अनारक्षित होळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली.

मध्य रेल्वे चालवणार २ अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्या
मध्य रेल्वे चालवणार २ अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्या

Holi Special Train : होळी सणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने दोन अतिरिक्त अनारक्षित होळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली. रेल्वेने यापूर्वी १२८ होळी विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली होती. आता खाली दिलेल्या तपशिलांनुसार सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन २ अतिरिक्त अनारक्षित होळी विशेष रेल्वे सेवा चालवणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पटना- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अनारक्षित विशेष (२ फेऱ्या)

०११५१ अनारक्षित विशेष दि. २३.०३.२०२४ (शनिवार) रोजी ११.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १३.५० वाजता पाटणा येथे पोहोचेल. (१ फेरी)

०११५२ अनारक्षित विशेष गाडी दि. २४.०३.२०२४ (रविवार) रोजी पाटणा येथून १७.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ०६.०० वाजता पोहोचेल. (१ फेरी)

थांबे: दादर, कल्याण,  मनमेल, भुसावळ,  खंडवा,  इटारसी,  जबलपूर,  कटनी,  प्रयागराज छिवकी, बक्सर आणि आरा. 

संरचना: २२ सामान्य द्वितीय श्रेणीचे डब्बे २ गार्डच्या ब्रेक व्हॅनसह.

या विशेष ट्रेनच्या सविस्तर थांबण्याच्या वेळेसाठी कृपया www.enquiry ला भेट द्या. Indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

प्रवाशांनी या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

IPL_Entry_Point