नेक्सस सीवूडस् मॉलकडून मुंबईकरांसाठी ‘होळी ब्लास्ट’ आयोजन करण्यात आले आहे. सुरक्षित वातावरणात सण साजरा करण्याची संधी नेक्सस सीवूड्सने मुंबईकरांसाठी आणली आहे. नवी मुंबई येथील सीवूडस् स्टेशन रोड जवळील नेक्सस सीवूडस् मॉलमधील दुसऱ्या मजल्यावरील ओपन पार्किंग एरियामध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. २५ मार्च रोजी सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहील.
होळी ब्लास्टमध्ये मुंबईकरांना लाईव्ह म्युझिक सोबत चाटचा देखील आस्वाद घेता येणार आहे. पारंपरिक थंडाई, विविध चाट, मोमोज् स्टॉल त्याचबरोबर चहा, कॉफी, कॉकटेल यांसह होळी स्पेशल पेयाचा देखील आनंद लुटता येणार आहे. तसेच बॉलीवूड आणि हॉलिवूड गाणी वाजवणारे लोकप्रिय डी.जे रिचल आणि डी.जे मॅक यांच्यासोबत होळी ब्लास्टमध्ये संगीताचा आनंद नागरिकांना लुटता येईल.
होळी ब्लास्ट हा नवी मुंबईतील सर्वात आनंददायक व उत्साहवर्धक कार्यक्रम ठरणार आहे. तुमच्या नातेवाईकांसह मित्र-परिवारांसोबत होळी पार्टीचा अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी पेटीएम इन्सायडरवर आपले तिकीट बुक करा आणि होळी ब्लास्टचा आनंद लुटा, अशी माहिती नेक्सस सीवूडस् मॉलच्या व्यवस्थापकीय मंडळाने दिली.