HMPV Outbreak in Nagpur : कोरोनानंतर आता चीनमध्ये नव्या व्हायरसचा उद्रेक झाला आहे. दवाखान्यात रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. या विषाणूच धसका संपूर्ण जगाने घेतला आहे. काल देशात या विषाणूने बाधित पहिला रुग्ण आढळला होता. दरम्यान, आता महाराष्ट्रातही या व्हायरसने एंट्री केली असून नागपुरातील दोन मुलांना या विषाणूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता राज्याची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.
चीनमधील नव्या व्हायरसनं जगभरातील देशांचं टेंशन वाढलं आहे. सोमवारी बंगळुरू व गुजरातमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळूले आहेत. त्या नंतर आता नागपुरमध्येही एचएमपीव्हीची लागण झालेले दोन आढळले आहे. नागपूरमध्ये दोन लहान लहान मुलांना HMPV ची लग्न झाली असल्याचे निष्पन्न झालं आहे. त्यांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह अले असून यात ७ वर्षांचा मुलगा व १३ वर्षांच्या मुलीला एमएमव्हीपी विषाणूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
या दोन्ही मुलांना विषाणूची लागण झाल्याचे कळताच त्यांना ३ जानेवारीला दवाखान्यात भरती करण्यात आलं होत. यावेळी त्यांचे नमुने घेण्यात आले होते. त्यांचा हवाल पॉझिटिव्ह असल्याचं आता आढळलं आहे. या दोन्ही मुलांना खोकला व ताप होता. यामुळे त्यांनी खासगी दवाखान्यात उपचार सुरू केले होते. असे असले तरी त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले नाही. हे दोन्ही रुग्ण बरे झाल्याची माहिती मिळत आहे. दोघांवर योग्य औषधोपचार करण्यात आले. यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. या दोघांमध्येही सामान्य लक्षणं होती. मात्र, कोणतीही गंभीर लक्षणं नसल्याने त्यांना अॅडमिट करून घेण्यात आले नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
भारतात एचएमपीव्ही म्हणजेच ह्युमन मेटान्यूमोव्हायरसचे रुग्णांची संख्या हळू हळू वाढत आहे. देशात आतापर्यंत ७ जण या व्हायरसला बळी पडले आहेत. आतापर्यंत तीन राज्यांमध्ये एचएमपीव्हीचे रुग्ण आढळले आहेत. या विषाणूच्या रुग्णवाढीमुळे कोव्हिडसारखी परिस्थिती निर्माण होणार नाही, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. नेदरलँड्समध्ये २००१ साली पहिल्यांदा हा विषाणू आढळला होता.
बेंगळुरू, नागपूर आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी दोन तर अहमदाबादमध्ये एक रुग्ण आढळला आहे. आयसीएमआरने बेंगळुरूच्या बॅप्टिस्ट रुग्णालयात दोन रुग्ण आढळल्याचे स्पष्ट केलं. तर पहिला रुग्ण बेंगळुरू येथे आढळला. येथे ३ वर्षीय मुलीचा या विषाणूची लागण झाल्याचे उघड झालं आहे. या मुलीला ताप आणि सर्दी झाली होती. त्यामुळे तिला डिसेंबरमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ती मुलगी आता बरी झाली असून तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
संबंधित बातम्या