Hingoli News: हिंगोलीत पोलिसांच्या त्रासाला वैतागून एका तरुणाने झाडाळा गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी एका पीएसआय अधिकाऱ्यासह 9 जणांवर सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मृत तरुणाचे एका तरुणीवर प्रेमसंबंध होते. यासाठी पोलिसांकडून त्याला वारंवार त्रास दिला जात होता. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण हिंगोलीतील एका गावातील रहिवाशी होता आणि त्याचे जालना येथील पिंपळगाव येथील मुलीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, यासाठी पोलिसांकडून त्याला त्रास देण्यात आला. अखेर त्रास सहन न झाल्याने तरुणाने त्याच्या गावातील एका शिवारात असलेल्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी संबंधित पीएसआयसह ९ जणांविरोधात तरुणाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यातील कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्नहत्या केली. ही घटना ११ ऑगस्ट २०२४ रोजी घडली. मृतदेहाजवळ पोलिसांना सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये मृत विद्यार्थ्याने शिक्षक आणि वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले. याप्रकरणी कल्याणमधील कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासला सुरुवात केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगा कल्याण पूर्वेला वडील, आई आणि बहिणीसोबत राहत होता. त्याचे वडील नवी मुंबईतील एका खासगी कंपनीत नोकरी करतात आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ११ आगस्टला सायंकाळी सातच्या सुमारास मुलगा घरी एकटाच असताना त्याची आई बहिणीसाठी शाळेच्या बैठकीला गेली होती. त्याचे वडील कामावरून घरी आल्याने मुलगा दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यानंतर शेजाऱ्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
या घटनेबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. परंतु, त्यानंतर पोलिसांना मृत मुलाने लिहिलेली सुसाइड नोट सापडली. शिक्षक आणि वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे सुसाइड नोटमध्ये लिहिण्यात आले.याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.