मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नरेंद्र मोदी २०२४ मध्ये पंतप्रधान झाले नाहीत, तर मी भरचौकात फाशी घेईन; शिंदे गटातील आमदाराचे वक्तव्य

नरेंद्र मोदी २०२४ मध्ये पंतप्रधान झाले नाहीत, तर मी भरचौकात फाशी घेईन; शिंदे गटातील आमदाराचे वक्तव्य

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 11, 2024 05:30 PM IST

Santosh Bangar : संतोष बांगर आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असतात. आताही त्यांनी मोदींबाबत असंच वक्तव्य केलं आहे.

 Santosh bangar statemen on pm Narendra modi
 Santosh bangar statemen on pm Narendra modi

२०२४ मध्ये जर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाहीत तर मी भरचौकात फाशी घेईन असं वक्तव्य शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांनी केलं आहे.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल शिवसेनेच्या आमदार अपात्रतेबाबत निकाल देत खरी शिवसेनाही शिंदेंचीच असल्याचा निर्वाळा दिला. या निकालावर प्रतिक्रिया देतानाआमदार संतोष बांगर यांनी विधान केले आहे.

संतोष बांगर आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असतात. आताही त्यांनी मोदींबाबत असंच वक्तव्य केलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार प्रकरणी निकाल दिल्यानंतर प्रतिक्रिया देताना संतोष बांगर यांनी हे विधान केलं. आमदार अपात्रतेचा निकाल आमच्याच बाजूने लागणार, हे मी छातीठोकपणे सांगितलं होतं असंही ते म्हणाले.

संतोष बांगर पुढे म्हणाले की, एप्रिलमध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. आताही छाती ठोकून सांगतो २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार. जर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले नाहीत तर हा संतोष बांगर भरचौकात फाशी घेईल.

संतोष बांगर यांनी याआधी कलमनुरी बाजार समिती निवडणुकीत १७ जागांवर विजय मिळाला नाही तर मिशा ठेवणार नाही असं विधान केलं होतं. त्यांना १७ जागा जिंकण्यात अपयश आले मात्र त्यांनी मिशा तर काढल्या नाहीत, मात्र त्यांच्या वक्तव्याची चर्चा जोरदार झाली होती.

जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीने शिवसेनेत फूट पडल्यानंतर संतोष बांगर उद्धव ठाकरे यांच्याजवळ जाऊन रडले होते. तसेच उद्धव ठाकरेंना सोडून मी कधीही जाणार नाही, असे म्हणाले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी ते शिंदे गटाला जाऊन मिळाले होते.

WhatsApp channel