हिंगोलीमध्ये कौटुंबिक वादातून राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) जवानाने सासरी जाऊन पत्नीवर सासरच्यांवर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता तर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या गोळीबारातील मृतांचा आकडा २ वर पोहोचला आहे.
हिंगोलीत कौटुंबिक वादातून पोलीस कर्मचाऱ्याने पत्नीसह सासू, मेहुणा आणि त्याच्या चिमुकल्यावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. विलास मोकाडे असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने केलेल्यागोळीबारामध्ये त्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता. तर चिमुकल्यासह २ जण गंभीर जखमी झाले होते. जखमी झालेल्या मेव्हुण्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
विलास मुकाडे या जवानाने स्वतःच्या कुटुंबासह सासूरवाडीतील लोकांवर गोळीबार केल्याची घटना २४ डिसेंबर रोजी घडली होती. जवानाने आपल्या कुटुंबावरच बेछुट गोळीबार केला होता.
या गोळीबारात पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता. सासू, मेहुणा आणि चिमुकल्यावर नांदेड येथे उपचार सुरू होते. आज उपचारादरम्यान आरोपीचा मेहुणा योगेश धनवे यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे घटनेतील मृतांची संख्या दोन वर पोहोचली आहे. दरम्यान आरोपी विलास मोकाडे याला पोलिसांनी सेवेतून निलंबित केलं आहे, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटकही करण्यात आली आहे.
आरोपीची सासू आणि त्याच्या २ वर्षाच्या मुलावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.गोळीबार करून आरोपी जवानाने घटनास्थळावरून पळ काढला होता. पोलिसांनी त्याला अटक केली. कौटुंबिक वादातून जवानाने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.
संबंधित बातम्या