हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. वसमत तालुक्यातील आडगावामध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. तरुणाने तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
संतोष पवार असे हत्या झालेल्या तलाठ्याचे नाव आहे. तलाठी कार्यालयात काम करत असताना प्रताप कराळे नामक तरुणाने त्यांच्यावर हल्ला केला. तरुणाने तलाठी पवार यांच्या डोळ्यात थेट मिर्चीची पूड टाकत चाकूने अनेक वार केले. या हल्ल्यात संतोष पवार जागीच ठार झाले. या हल्ल्यानंतर कार्यालयात असलेल्या शिकाऊ तलाठी बालाजी डवरे यांनी आरोपीला पकडून त्याच्या हातातून चाकू हिसकावून घेतला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. कार्यालयातील लोकांनी तलाठी संतोष पवार यांना जखमी अवस्थेत परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कराळे याचं तलाठ्याकडे काम प्रलंबित होतं. या कामासाठी तरुणाने चावडीवर अनेक फेऱ्या मारल्या होत्या. तरीही शासकीय काम पूर्ण करण्यास तलाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप तरुण करत असल्याचे सांगितले जात आहे. काम करण्यास टाळाटाल केल्याने चिडलेल्या तरुणाने संतापाच्या भरात तलाठ्याची हत्या केली.
दरम्यान चावडीतच तलाठ्याची हत्या केल्याने कुटूंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पवार यांच्या कुटुंबाने अधिकाऱ्यांसमोर आक्रोश करत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी तसेच संभाजीनगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी संतोष पवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. आरोपी संतोष कराळे हा वारंवार तलाठी संतोष पवार यांना तुम्ही माझी जमीन इतरांच्या नावावर करून देताल, असे म्हणत त्रास देत होता. मात्र असं करता येत नसतं अस वारंवार सांगूनही आरोपीने ऐकले नाही. त्याने आज थेट पवार यांचा निर्दयीपणे खून केला. दरम्यान तलाठी संघटनेने या घटनेचा निषेध केला आहे.
एका डिलिव्हरी बॉयने आपल्या मित्राची किरकोळ कारणावरून चाकूने भोसकून हत्या केली आहे. ही सिंहगड रोड येथील नऱ्हे येथे घडली आहे. रेनकोटवरून झालेल्या वादातून मित्राने मित्राची हत्या केली आहे. आदित्य वाघमारे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, सुरेश भिलारे असे आरोपी तरुणाचे नाव आहे