मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune news : आधी एफटीआयआय आता एनएफएआयच्या आवारात हिंदुत्ववादी संघटनेचा राडा; 'या' चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोध

Pune news : आधी एफटीआयआय आता एनएफएआयच्या आवारात हिंदुत्ववादी संघटनेचा राडा; 'या' चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोध

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 12, 2024 01:23 PM IST

Protest in Pune National Film Archive of India : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवात ‘आय एम नॉट द रिव्हर झेलम’ या चित्रपटाच्या प्रदर्शनास हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध करून आंदोलन केले

Protest in Pune National Film Archive of India
Protest in Pune National Film Archive of India

Protest in Pune National Film Archive of India : पुण्यात काही दिवसांपूर्वी एफटीआयआयमध्ये बाबरी मशीडीच्या समर्थनार्थ पोस्टर लावण्यात आले होते. त्यावरून हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला होता. त्यानंतर आता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवात ‘आय एम नॉट द रिव्हर झेलम’ या चित्रपटाच्या प्रदर्शनास हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध करून आंदोलन केले. या चित्रपटाचे प्रदर्शन देखील बंद करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला.

Ashok Chavan : अशोक चव्हाण यांचा काँग्रेसला रामराम, काँग्रेसला मोठा झटका

काश्मिरमधील हिंसाचारावर ‘आय एम नॉट द रिव्हर झेलम’ या चित्रपटाची निर्मिती ही दिल्लीस्थित दिग्दर्शक प्रभाश चंद्रा यांनी केली असून या चित्रपटाचे प्रदर्शन रविवारी (दि ११) राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात चित्रपट प्रदर्शित केला जाणार होता. तसेच दिग्दर्शक चंद्रा हे देखील चित्रपटासंदर्भात बोलणार होते. हा चित्रपट काश्मिरमधील हिंसाचारावर आधारित असून यात भारतीय लष्करावर टीका करण्यात आली आहे, असा आरोप समस्त हिंदू बांधव संघटनेच्या कारकर्त्यांनी केला. तसेच २० ते ३० कार्यकर्ते हे चित्रपट प्रदर्शनादारम्यान, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या आवारात आले. यावेळी त्यांनी घोषणाबाजी केली आणि या चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोध केला. दरम्यान, याची माहिती ही पोलिसांना देण्यात आली. पोलिस बंदोबस्तात या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी अध्याप गुन्हा दाखल केला नाही.

काही दिवसांपूर्वी ‘एफटीआयआय’मध्ये ‘रिमेंबर बाबरी डेथ ऑफ कॉनस्टिट्यूशन’ चे फलक लावण्यात आले होते. यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी आवारात आंदोलन करून येथील विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. या प्रकरणी समस्त हिंदू बांधव संघटनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आंदोलन केले, असे डेक्कन पोलिसांनी सांगितले.

WhatsApp channel

विभाग