मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai HC : मुंबई आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयांना मिळाले नवे मुख्य न्यायाधीश, ‘या’ न्यायमूर्तींची झाली निवड

Mumbai HC : मुंबई आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयांना मिळाले नवे मुख्य न्यायाधीश, ‘या’ न्यायमूर्तींची झाली निवड

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jul 24, 2023 10:07 PM IST

Bombay High court new chief justice : मुंबई उच्च न्यायालय आणिआंध्र प्रदेश उच्च न्यायालयात नव्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Bombay high court
Bombay high court

मुंबई उच्च न्यायालय (High courts of Bombay) आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात (Andhra Pradesh High court) नव्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ट्वीट करून याची माहिती दिली आहे. जस्टिस देवेंद्र कुमार उपाध्याय यांना मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केले आहे तर न्यायमूर्ती धीरज सिंह ठाकूर यांना आंध्र प्रदेश हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी कार्यरत होते. तर जस्टिस देवेंद्र सिंह ठाकूर मुंबई न्यायालयात न्यायाधीश होते. जस्टिस धीरज सिंह ठाकूर भारताचे माजी सरन्यायाधीश टीएस ठाकूर यांचे लहान भाऊ आहेत. जस्टिस ठाकूर यांच्या नावाची शिफारस करताना कॉलेजियमने म्हटले होते की, मणिपूर हायकोर्टातील मुख्य न्यायाधीशपदी पदोन्नतीसाठी त्यांची ९ फेब्रिवारी २०२३ ची शिफारस सरकारकडे प्रलंबित आहे.

कॉलेजियमने म्हटले की, सर्व गोष्टींचा विचार करून कॉलेजियमने निर्णय घेतला आहे की, जस्टिस धीरज सिंह ठाकूर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात चीफ जस्टिस पदी नियुक्त होण्यासाठी पूर्णपणे पात्र आहेत.

WhatsApp channel