मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bombay High Court : मुंबई हायकोर्टाचा तृतीयपंथी विद्यार्थ्यांना दिलासा.. दिला मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई हायकोर्टाचा तृतीयपंथी विद्यार्थ्यांना दिलासा.. दिला मोठा निर्णय

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 26, 2023 11:22 PM IST

High Court On Transgender Student :मुंबई उच्च न्यायालयाने तृतीयपंथी विद्यार्थ्यांना दिलासा देत शैक्षणिक नोंदीमध्ये आपलं नाव व लिंग बदलण्यास परवानगी असल्याचा निर्णय दिला आहे.

Bombay High Court
Bombay High Court

High Court On Transgender : मुंबई उच्च न्यायालयाने तृतीयपंथी विद्यार्थ्यांना दिलासा देत शैक्षणिक नोंदीमध्ये आपलं नाव व लिंग बदलण्यास परवानगी असल्याचा निर्णय दिला आहे. ही सुविधा सध्या शिक्षण घेत असलेल्या किंवा नव्याने नोंदणी करत असलेल्या तृतीयपंथी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या निर्णयाची राज्यातील सर्व शिक्षणसंस्थांनी अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्य सरकारने जारी कराव्यात, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

टाटा समाज विज्ञान संस्थेच्या (TISS) माजी विद्यार्थ्यानं संस्थेच्या नोंदींमधून स्वतःचं नाव आणि लिंग बदलण्याच्या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. 

खंडपीठाने आदेश देताना म्हटलं की, स्त्री किंवा पुरूष म्हणून स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव आणि भावनांना ओळखण्यास काहींना वेळ लागतो. मात्र त्यामुळे एखाद्याला स्वःत्वाची ओळख ठरवण्याची परवानगी नाकारता येणार नाही. याचिकाकर्त्याला आपलं नाव, ओळख किंवा आधी निवडलेलं लिंग लादण्याची सक्ती कोणतीही संस्था करू शकत नाही, असंही हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे. 

याचिकाकर्त्यांनी साल २०१३ मध्ये एका शिक्षण संस्थेतून मुलगी म्हणून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलं होत. मात्र साल २०१५ मध्ये तिनं दुसरे नाव स्वीकारत स्वत: ची ओळख तृतीयपंथी म्हणून जाहीर केली. आता याचिकाकर्त्याला विधी शाखेचे शिक्षण घ्यायचे असून नवीन नाव आणि बदलेल्या लिंगासह नव्यानं शैक्षणिक नोंदी उपलब्ध करून देण्याकरता शिक्षण संस्थेकडे धाव घेतली होती. परंतु, त्या संस्थेकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने याचिकाकर्त्यानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. 

WhatsApp channel