मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik crime : नाशिक हादरले ! घरासमोरून बड्या व्यावसायिकाचे अपहरण

Nashik crime : नाशिक हादरले ! घरासमोरून बड्या व्यावसायिकाचे अपहरण

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 03, 2023 11:42 AM IST

Nashik News : नाशिक येथून एका बड्या व्यावसायिकाचे त्याच्या घरासमोरून अपहरण करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पथके तयार केली असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

Nashik News
Nashik News

नाशिक : नाशिक येथे गुन्हेगारीच्या घटनांत वाढ झाली आहे. येथील एका बड्या व्यावसायिकाचे त्यांच्या घरासमोरून अपहरण करण्यात आले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि गजरा ग्रुपचे प्रमुख हेमंत पारख असे अपहरण झालेल्या बड्या व्यावसायिकाचे नाव आहे. नाशिक मधील इंदिरानगर भागात त्यांच्या घरासमोरून पारख यांचे रात्री ९.३० च्या सुमारास अपहरण करण्यात आले.

Murder : पती आणि तीन मुलांची हत्या करून पत्नी फरार; एकाच घरात चार मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ

हेमंत पारखे हे नाशिक येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. हेमंत पारख हे काल रात्री त्यांच्या घराजवळ फिरत होते. यावेळी अचानक काही अज्ञात व्यक्तींनी कार मधून येत पारख यांचे अपहरण केले. आरोपी हे कार आणि दुचाकीवरून आल्याचे काही प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी आले असून त्यांचा शोध घेतला जात आहे. काल रात्री त्यांच्या शोधासाठी पथकांची स्थापना करण्यात आली असून ती रवाना करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे देखील घटनास्थळी आले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही तपासून अपहरणकर्त्यांचा शोध घेतला जात आहे. पारख यांचे अपहरण का करण्यात आले या बाबत कोणतीही माहिती नाही.

या घटनेमुळे नाशिक मधील कायदा आणि सूव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरोपी आता थेट घराजवळ येत अपहरण करत असल्याने नाशिक मध्ये दहशतीचे वातावरण आहे. शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. मात्र, आठ तासाहून अधिक काळ लोटला असून पारख यांचा शोध लागलेला नाही.

WhatsApp channel

विभाग