heavy vehicles entry ban in Pune : पुण्यात वाहतूक कोंडीची (Pune traffic problem) समस्या गंभीर झाली आहे. त्यात शहरात सुरू असलेले विविध प्रकल्प, मेट्रो आणि उड्डाणपूलाची कामे यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पाडली आहे. रास्ते अरुंद झाल्यामुळे शहरात येणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्त्यावरील जागा मोठया प्रमाणावर व्यापली जाऊन वाहतूकीस अडथळा निर्माण होत असल्याने देखील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाल्याने वाहतूक पोलिसांनी पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल केला आहे. या पुढे शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यांची वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उप-आयुक्त शशिकांत बोराटे, यांनी दिली आहे.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातून पिंपरी चिंचवड, सोलापूर, अहमदनगर, सातारा, मुंबई व इतर ठिकाणी जाणारी व येणारी सर्व प्रकारची जड अवजड माल वाहतूक करणारे ट्रेलर, कंटेनर्स, मल्टी अॅक्सल वाहने, आर्टिक्युलेटेड वाहनांना तात्पुरत्या स्वरूपात प्रायोगिक तत्वावर मंगळवार (दि ५) पासून शहरातून जाण्यास बंदी करण्यात आली आहे. ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
पुणे नगर मार्गावरून वाघोली पासुन पुणे शहराकडे २४ तास प्रवेश बंद करण्यात आला आहे.
पुणे नगर रोडवरील शिक्रापूर येथुन उजवीकडे वळण घेवून चाकण मार्गे पिंपरी चिंचवड व तळेगाव दाभाडे मार्गे मुंबईकडे जातील. तसेच वरील मार्गावरूनच अहमदनगरकडे जातील
पुणे सोलापूर व पुणे सासवड रोडने येणाऱ्या वाहनांना हडपसर नोबल हॉस्पिटल चौक खराडी बायपास चौकाकडे २४ तास प्रवेश बंद राहील.
पुणे सोलापूर रोडवरून येणाऱ्या वाहनांनी थेऊर फाटा येथून उजवीकडे वळण घेवून थेऊर, लोणीकंद, शिक्रापूर मार्गे जावे
पुणे सासवड रोडवरून येणाऱ्या वाहनांनी हडपसर येथे यु टर्न घेवून थेऊर फाटा येथुन डावीकडे वळण घेवून थेऊर, लोणीकंद, शिक्रापूर मार्गे पर्यंत जावे.
खालील मार्गावर ७ ते रात्री ११ पर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी
पुणे सोलापूर रोड येथुन सातारा, मुंबई कडे जाणाऱ्या वाहनांनी हडपसर येथुन डावीकडे वळण घेवून सासवड रोडवरून मंतरवाडी फाटा उजवीकडे वळण घेवून खडी मशीन चौक ते कात्रज चौक येथून सातारा कडे किंवा नवले पुल मार्गे मुंबईकडे जातील. तसेच सासवडकडुन येणाऱ्या वाहनांनी मंतरवाडी चौकामधून डावीकडे वळण घेवून वरील मार्गाचा वापर करावा.
मुंबई कडुन येणारी वाहने नवले पूल डावीकडे वळण घेवून कात्रज चौक तसेच साताराकडुन येणारी वाहने कात्रज चौक येथून खडी मशीन चौक मंतरवाडी चौक डावीकडे वळण घेवून हडपसर मार्गे सोलापूर कडे व मंतरवाडी चौकामधून उजवीकडे वळण घेवून सासवडकडे जाये. तसेच वरील प्रमाणे सर्व प्रकारच्या वाहनांना खालील नमुद ठिकानांपासून शहराचे अंतर्गत भागामध्ये येण्यास २४ तास प्रवेश बंद असेल.
सोलापूर रोड नोबल हॉस्पिटल चौक, .
अहमदनगर रोड केसनंद फाटा याघोली
मुंबई पुणे रोड हॅरीस बीज,
औध रोड राजीव गांधी पुल,
बाणेर रोड हॉटेल राधा चौक,
पाषाण रोड रामनगर जंक्शन,
पौड रोड चांदणी चौक,
सिंहगड रोड वडगाव पुल चौक,
सातारा रोड कात्रज चौक,
सासवड रोड (बोपदेव घाट मार्ग) खडी मशीन चौक,
कात्रज मंतरवाडी बायपास रोड उंड्री चौक,
आळंदी रोड बोफखेल फाटा चौक
संबंधित बातम्या