मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Nagar road traffic update : पुणेकरांनो नगर रस्त्यावरून प्रवास करताय? गर्दीच्या वेळी अवजाड वाहनांना बंदी

Pune Nagar road traffic update : पुणेकरांनो नगर रस्त्यावरून प्रवास करताय? गर्दीच्या वेळी अवजाड वाहनांना बंदी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 21, 2024 06:13 AM IST

Pune Nagar road traffic update : पुणे नगर मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठा बदल केला आहे. गर्दीच्या वेळी या मार्गावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

Pune Nagar road traffic update
Pune Nagar road traffic update

Pune nagar road traffic update : पुणे नगर मार्गावर वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. त्यात या मार्गावर सुरू असलेली मेट्रोच्या आणि रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. या मुळे कल्याणीनगर, खराडी, विमाननगर तसेच वाघोलीला जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत असल्याने तसेच येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या मार्गावरील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. गर्दीच्या वेळी या मार्गावर आता अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. हा बदल प्रायोगिक तत्वावर करण्यात आला आहे.

Amrit Bharat Express : प्रवाशांसाठी खुशखबर! लवकरच ५० नवीन अमृत भारत ट्रेन धावणार

पुणे नगर मार्ग पुण्यातील मोठा मार्ग आहे. विदर्भात जाणाऱ्या ट्रॅव्हल्स, औद्योगिक वसाहतीत जाणारी वाहने, प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या, टँकर, गॅस टँकर या सारख्या वाहनांची मोठी गर्दी असते. त्यामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत असते. त्यात मेट्रो आणि रस्त्याची कामे सुरू असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत असल्याने ही कोंडी सोडवण्यासाठी प्रायोगिक तत्वावर या मार्गावरील वाहतूक कोंडीत बदल करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने गर्दीच्या वेळी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

Sharad Pawar : शरद पवारांचे कोल्हापुरातून शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत मोठं वक्तव्य, जागावाटपाचा फॉर्म्युलाही सांगितला

पुणे-नगर रस्त्यावरील वाघोली परिसरातील वाघेश्वर चौक, वाघोली ते खराडी बाह्यवळण मार्गावर सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ यावेळेत अवजड वाहनांना बंदी राहणार आहे. केसनंद रस्त्यावरील वाघोली ते शिवाजी चौक ते केसनंद गाव रस्त्यावर जड वाहनांना सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ यावेळेत बंदी राहणार आहे.

लोहगाव ते वाघोली ते धानोरी या मार्गावर जड वाहनांना सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ यावेळेत जड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. पुणे-नगर रस्त्यावरील वाघेश्वर चौक, वाघोली ते लोणीकंद रस्त्यावर सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ यावेळेत जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

IPL_Entry_Point

विभाग