मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सायन रेल्वे पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद; पाहा पर्यायी मार्गांची यादी

सायन रेल्वे पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद; पाहा पर्यायी मार्गांची यादी

Jun 27, 2024 09:40 AM IST

sion railway bridge traffic update : वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला एलबीएस मार्ग, धारावी आणि शीव यांना जोडणाऱ्या, शीव स्थानकावरील अत्यंत महत्वाचा सायन रेल्वे पूल शुक्रवारी मध्यरात्रीपासून अवजड वाहनांसाठी बंद राहणार आहे. येथील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

सायन रेल्वे पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद; पाहा पर्यायी मार्गांची यादी
सायन रेल्वे पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद; पाहा पर्यायी मार्गांची यादी

sion railway bridge traffic update : वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला एलबीएस मार्ग, धारावी व शीव या महत्वाच्या मार्गांना जोडणाऱ्या, शीव सायन  स्थानकावरील अत्यंत महत्वाचा उड्डाणपुल असलेल्या सायन रेल्वे पूलावरून अवजड वाहनांना प्रवासास बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शुक्रवारी रात्रीपासून उड्डाणपूल बंद करण्यात येणार आहे. तसेच येथील  वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

सायन पूर्व-पश्चिम जोडणारा सायन ओव्हर ब्रिज हा मध्य रेल्वे प्राधिकरणाकडून थोकादायक घोषीत करण्यात आला आहे. त्यामुळे या पूलावरून  अवजड वाहने व २.८० मिटर उंचीच्या वरील वाहनांना बंदी घालण्याबाबत प्रस्थाव  रेल्वे प्राधिकरणाने दिला असून  या मार्गावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून सायन ओव्हर ब्रिज पश्चिम वाहिनी मार्गे लाल बहादुर शास्त्री मार्ग तसेच संत रोहिदास मार्गाकडे  जाणारी वाहतूक त्याचप्रमाणे लाल बहादुर शास्त्री मार्गावरून तसेच संत रोहिदास मार्गावरून  सायन ओव्हर ब्रिज पुर्व वाहिनीवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गे जाणारी वाहतूक ही शुक्रवार (दि २९) पासून १३ जुलैपर्यंत अवजड वाहने व २.८० मिटर उंचीच्या  वाहनांकरीता बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अशी असेल वाहतूक

प्रवेश बंद :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून लाल बहादुर शास्त्री मार्ग व संत रोहिदास मार्गाकडे जाणारी वाहतूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग दक्षिण वाहिनी सायन जंक्शन वरील वाहतुक ही सायन मार्गे वळवण्यात आली आहे.

पर्यायी मार्ग :-

सर्कल सायन हॉस्पिटल जंक्शन येथून उजवे वळण घेवून व किंग्ज सर्कल कडून उत्तर वाहिनीवरून सायन हॉस्पिटल जंक्शन येथून डावे वळण घेवून येणारी वाहतूक सुलोचना शेट्टी मार्गाने पुढे कुंभारवाडा जंक्शन येथून कुर्ला, पश्चिम द्रुतगती मार्ग व बांद्रा कडे कुंभारवाडा जंक्शन येथून सरळ संत कबीर मार्ग (६० फुट) मार्गाने केमकर चौक येथून उजवे वळण  घेवून सायन माहीम लिंक रोडने टी.जंक्शन येथून इच्छित स्थळी जातील.

माहिमकडे - कुंभारवाडा जंक्शन येथून सरळ संत कबीर मार्ग (६० फुट) रोडने केमकर चौक येथून डावे वळण घेवून एस. एल. रहेजा मार्गे इच्छित स्थळी जातील. तर कुंभारवाडा जंक्शन येथून डावे वळण घेवून माटुंगा लेबर कॅम्प पुढे टी. एच. कटारीया मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद :-

लाल बहादुर शास्त्री मार्ग व संत रोहिदास मार्गावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

पर्यायी मार्ग :-

कुर्त्याकडून लाल बहादुर शास्त्री मार्गाने जाणारी वाहने ही पैलवान नरेश माने चौकापुर्वी धारावी कचरप‌ट्टी जंक्शन सिग्नल येथे उजवे वळण घेऊन धारावी डेपो रोडने पुढे सायन बांद्रा लिंक रोड धारावी टी जंक्शन केमकर चौक डावे वळण घेवून पूढे संत कबीर मार्ग (६० फुट रोड) वरून इच्छीत स्थळी जातील.

तर पश्चिम द्रुतगती मार्ग व कलानगर जंक्शन कडून सायन बांद्रा लिंक रोडने येणारी वाहतूक धारावी टी. जंक्शन येथून उजवे वळण घेवून केमकर चौक डावे वळण घेवून संत कबीर मार्गाने (६० फुट रोड) कुंभारवाडा जंक्शन सायन हॉस्पीटल ब्रिज (कुंभारवाडा ब्रिज) मार्गे त्यांच्या इच्छीत स्थळी जातील.

सायन ओव्हर ब्रिज हा अवजड वाहने व २.८० मिटर उंचीचे वरील सर्व वाहनांकरीता बंद केल्याने वळविण्यात आलेल्या वाहतूकीमुळे वाहतूक कोंडी होवू नये म्हणून नो-पार्किंग करण्यात आलेले मार्ग हे पुढील प्रमाणे राहतील.

१. संत कबीर मार्ग (६० फुट) रोड सायन हॉस्पीटल ब्रिज (कुंभारवाडा ब्रिज) ते केमकर चौक पर्यत दोन्ही वाहिनी

२. सायन माहिम लिंक रोड- टि जंक्शन ते माहिम फाटक पर्यंत दोन्ही वाहिनी

३. माटुंगा लेबर कॅम्प-टि.एच. कटारिया मार्ग हा कुंभारवाडा जंक्शन ते शोभा हॉटेल पर्यत दोन्ही वाहिनी

४. सुलोचना शेटट्टी मार्ग- सायन हॉस्पीटल जंक्शन ते सायन हॉस्पीटल गेट नं. ७ पर्यंत दोन्ही वाहिनी

५. भाऊ दाजी रोड- सायन हॉस्पीटल गेट नं. ७ ते रेल्वे ब्रिज दोन्ही वाहिनी

६. संत रोहिदास मार्ग-पैलवान नरेश माने चौक ते वाय जंक्शन दोन्ही वाहिनी

७ . धारावी डेपो रोड - वाय जंक्शन ते कचरपटट्टी जंक्शन एल. बी. एस. रोड दोन्ही वाहिनी.

८ . सायन बांद्रा लिंक रोड वाय जंक्शन ते टि जंक्शन दोन्ही वाहिनी

९. के. के. कृष्णन मेनन मार्ग (९० फुट रोड) कुंभारवाडा जंक्शन ते अशोक मिल नाका दोन्ही वाहिनी.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर