Pune Traffic update news : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यात झालेल्या पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली असून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुढील काही दिवस शहरातील वाहतुकीच्या नियमांत बदल करण्यात आले आहेत. १२ ऑगस्टपर्यंत शहरातील ३० मुख्य वाहतूक चौक आणि जास्त वाहतुकीच्या ठिकाणी अवजड वाहनांवर बंदी लागू करण्यात आली आहे.
वाहतूक पोलिसांनी शहरातील ३० ठिकाणी अवजड वाहनांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी घातली आहे. सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत अवजड वाहनांना या ठिकाणी प्रवेश बंदी असून वाहतूक शाखेचे आदेश १२ ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहेत. या अधिसूचनेनुसार, ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी नियमितपणे होते त्या ठिकाणी डंपर, ट्रक, सिमेंट मिक्सर आदी अवजड वाहनांना प्रवेश बंदी असेल. मात्र या ठिकाणी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे.
शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि शहरातील ९० टक्के वाहतूक कोंडी असलेल्या ३२ ठिकाणची वाहतूक सुरळीत करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा हा एक भाग आहे. पुणे महापालिकेकडून निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम होत असल्याच्या आणि रस्त्यांचे काही भाग वाहून गेल्याच्या तसेच पावसाळ्यात काही भागात पाणी साचण्याच्या सततच्या तक्रारींमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा, हा या मागच्या उद्देश असल्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.
मनोज पाटील म्हणाले, अतिवृष्टीमुळे रस्त्यांची दुरवस्था आणि खड्डे पडल्याने ये-जा करणे अवघड होत असल्याने या तात्पुरत्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. या बंदीमुळे या ठिकाणच्या वाहतुकीचा ताण कमी होऊन वाहतूक सुरळीत होईल.
संचेती चौक, पौड फाटा चौक, राजाराम पूल, दांडेकर पूल चौक, निलयम पूल (ना सी फडके चौकाच्या दिशेने), सावरकर पुतळा चौक (बाजीराव रोडच्या दिशेने), लक्ष्मीनारायण सिनेमा चौक (जेधे चौकाच्या दिशेने), पांडोल अपार्टमेंट चौक (महात्मा गांधी रोडच्या दिशेने), खान्या मारुती चौक (पूर्व रस्त्याकडे), पॉवर हाऊस चौक (मालधक्का चौकाच्या दिशेने) या प्रमुख चौकांमध्ये अवजड वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. आरटीओ चौक (शाहीर अमर शेख चौकाच्या दिशेने), पाटील इस्टेट चौक (आरटीओ चौकाच्या दिशेने), ब्रेमेन चौक (विद्यापीठ चौकाच्या दिशेने), शास्त्रीनगर चौक (येरवडा ते गुंजन चौक) आणि आंबेडकर चौक (सदलबाबा चौकाकडे).
मुंढवा चौक (ताडीगुट्टा चौकाच्या दिशेने), मूनलाईट चौक (सदलबाबा चौकाच्या दिशेने), नोबल चौक (भैरोबा चौकाकडे), लुल्लानगर चौक (भैरोबा चौकाकडे), लुल्लानगर चौक (गोळीबार मैदान चौकाकडे), लुल्लानगर चौक (गंगाधाम चौकाकडे), बिबवेवाडी पुष्पा मंगल चौक (जेधे चौकाकडे), राजस सोसायटी (बिबवेवाडी महेश सोसायटी चौकाकडे), मुंबई-पुणे रोड पोल्ट्री चौक (आरटीओ चौक) वाहतूक पोलिसांच्या अधिसूचनेनुसार उंड्री (एनआयबीएम चौकाच्या दिशेने), पिसोली (हडपसरच्या दिशेने), हांडेवाडी (हडपसरच्या दिशेने), अभिमानश्री चौक, बाणेर रोड (विद्यापीठ चौकाकडे) आणि पाषाण रोड (विद्यापीठाच्या दिशेने).
संचेती चौक, पौड फाटा चौक, राजाराम पूल, दांडेकर पूल, निलयम पूल, सावरकर पुतळा चौक, लक्ष्मीनारायण सिनेमा चौक, सेव्हन लव्ह्स चौक, पांडोल अपार्टमेंट चौक, खान्या मारुती चौक, पॉवर हाऊस चौक, आरटीओ चौक, पाटील इस्टेट चौक, ब्रेमेन चौक, शास्त्रीनगर चौक, आंबेडकर चौक, चंद्रमा चौक, मुंढवा चौक, नोबल चौक, लुल्लानगर ते गोळीबार मैदान, लुल्लानगर ते गंगाधाम, पुष्पा मंगल चौक, राजस सोसायटी, पोल्ट्री चौक, उंड्री, पिसोली, हांडेवाडी, अभिमानश्री बाणेर, अभिमानश्री पाषाण.