मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Unseasonal Rain : कोकण, पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस; वीज पडून चिमुकलीचा मृत्यू

Unseasonal Rain : कोकण, पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस; वीज पडून चिमुकलीचा मृत्यू

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 20, 2024 09:02 PM IST

Unseasonable Rain in Maharashtra : अनेक जिल्ह्यात अवकाळीने धुमाकूळ घातला. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने पुणे, सोलापूर व कोकणाला झोडपून काढले. अनेक ठिकाणी गारपीटही झाली. सोलापूर जिल्ह्यात अंगावर वीज पडून ९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.

अनेक जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा. सोलापुरात वीज पडून चिमुकली ठार
अनेक जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा. सोलापुरात वीज पडून चिमुकली ठार

unseasonable rain in Maharashtra : राज्यात या आठवड्यात वातावरणात खूपच बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठवाडा, विदर्भासह अनेक जिल्ह्यांना अवकाळीपावसाचा तडाखा (unseasonable rain ) बसला आहे. एकीकडे अंगाची लाही लाही करणाऱ्या कडक उन्हामुळे लोकांचा घामटा निघत असून काही भागात वळीवाच्या पावसाने नागरिकांना उकाड्यापासून दिसाला दिला असला तरी पावसासह गारपिटीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रेंडिंग न्यूज

आज (शनिवार) अनेक जिल्ह्यात अवकाळीने धुमाकूळ घातला. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने पुणे, सोलापूर व कोकणाला झोडपून काढले. अनेक ठिकाणी गारपीटही झाली. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

दरम्यान सोलापूर जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावात अंगावर वीज (lightning strike) पडून ८ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. लावण्या हनुमंता माशाळे असं मृत मुलीचं नाव आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आज सोलापूर, पुणे, कोल्हापूर यापश्चिम महाराष्ट्रासह,कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये व धाराशिव, लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली असून काही भागात गारांचा पाऊस पडल्याने आंबा आणि द्राक्षे बागांचं नुकसान झालं आहे.

शनिवारी सकाळपासून उन्हाचा कडाका होता. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. दक्षिण सोलापूर जिल्ह्यात चिमुकलीच्या अंगावर वीज पडली. तिला तात्काळ उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटलाही अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने नदी-नाल्यांना पाणी आले होते. जवळपास दीड तास पाऊस सुरू होता.

 

हिंगोलीत सायंकाळच्या सुमारास विजांचा कडकडाटासह वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसल्याने उकाड्याने हैराण नागरिकांना दिसाला मिळाला. मात्र हळद, केळी, आंब्याच्या बागा आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.सोलापूर जिल्ह्यात जोरदार वाऱ्यामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. आंबे जमिनीवर पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

IPL_Entry_Point