मुंबई-गोवा महामार्ग वाहतूक कोंडीमुळे ठप्प! तब्बल ४ किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबई-गोवा महामार्ग वाहतूक कोंडीमुळे ठप्प! तब्बल ४ किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

मुंबई-गोवा महामार्ग वाहतूक कोंडीमुळे ठप्प! तब्बल ४ किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

Dec 27, 2024 12:42 PM IST

Traffic Jam On Mumbai Goa Highway : सलग सुट्यांमुळे व नवीन वर्षांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात जात असून यामुळे मुंबई गोवा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

मुंबई-गोवा महामार्ग वाहतूक कोंडीमुळे ठप्प! तब्बल ४ किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा
मुंबई-गोवा महामार्ग वाहतूक कोंडीमुळे ठप्प! तब्बल ४ किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

Traffic Jam On Mumbai Goa Highway : सलग सुट्यांमुळे व नवीन वर्षांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात जात असून यामुळे मुंबई गोवा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. माणगाव बाजारपेठ ते खरवली फाट्यापर्यंत तब्बल ४ ते ५ किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या कोंडीमुळे कोकणात व गोव्यात जाणारे पर्यटक मार्गावरच अडकून पडले आहे. त्यात माणगाव इथं बायपास चे काम रखडल्याने वाहतूक कोंडीत भर पडली आहे. दरम्यान, वाहतूक पोलिस सध्या मुंबई-गोवा महामार्गावरील कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

वर्षाअखेर पर्यटनाचा आस्वाद घेण्यासाठी गोवा आणि कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटक निघाले आहे. यामुळे मुंबई गोवा मार्गावर सकाळपासून वाहनांच्या रांगा लागल्या असून या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ही वाहतूक कोंडी प्रामुख्याने माणगाव बाजारपेठ परिसरात झाली आहे. गेल्या काही तासांपासून या मार्गावर वाहतूक ही ठप्प झाली आहे. वाहनांच्या तब्बल ४ ते ५ किमी पर्यंत रांगा लागल्या आहेत.

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षीच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक हे गोवा आणि कोकणात जायला निघाले आहे. नाताळपासून गोव्यात व कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई-गोवा महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. नाताळच्या दिवशी देखील या महामार्गावर माणगाव व इंदापूर येथे मोठी वाहतूक कोंडी झाली. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गोव्यात देखील डिसेंबरमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक जात असतात. या ठिकाणी सनबर्न महोत्सव, नाताळ व इतर इव्हेंटचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गोव्याला जाण्यास पसंती देतात. तसेच येथील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी देखील मोठ्या संख्येने पर्यटक जात असतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर