मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यात पहिल्याच पावसाने हलकल्लोळ..! रस्ते तुंबले, ३२ ठिकाणी झाडे कोसळली, अजित पवारांचं नागरिकांना आवाहन

पुण्यात पहिल्याच पावसाने हलकल्लोळ..! रस्ते तुंबले, ३२ ठिकाणी झाडे कोसळली, अजित पवारांचं नागरिकांना आवाहन

Jun 08, 2024 09:27 PM IST

Pune Rain Update : पुण्यात राज्यातील सगळ्यात जास्त पावसाची नोंद झाली आहे. आजच्या पावसाने रस्त्यांना नद्यांचे रुप आले.शिवाजी नगर,अलका टाकीज चौक,कोथरुड,कात्रज सिहगड रोड यासोबतच अनेक परिसरात रस्ते तुंबले.

पुण्यात पहिल्याच पावसाने हलकल्लोळ..! 
पुण्यात पहिल्याच पावसाने हलकल्लोळ..! 

दोन दिवसांपासून कोकणात रेंगाळलेला मान्सून आज पुण्यात दाखल झाला. शनिवारी सायंकाळच्या सुमारास पुणे शहर आणि परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. पुणे शहरातील शिवाजीनगर, पाषाण भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील पावसाबाबत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनी करून माहिती घेतली. काही तासात विक्रमी पाऊस पडल्यामुळे शहरात पाणीच पाणी झालं यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. प्रशासनाने तातडीनं उपाययोजना करत पावसात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी संबंधितांना दिल्या आहेत. तसेच जोपर्यंत पाणी ओसरत नाही, तोपर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनानं केलं आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रेंडिंग न्यूज

पुण्यात राज्यातील सगळ्यात जास्त पावसाची नोंद झाली आहे. आजच्या पावसाने रस्त्यांना नद्यांचे रुप आले.  शिवाजी नगर, अलका टाकीज चौक, कोथरुड, कात्रज सिहगड रोड यासोबतच अनेक परिसरात रस्ते तुंबले. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागला. 

अजित पवारांनी ट्विट केलं आहे की, पुण्यात शनिवारी सायंकाळी मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे काही भागात पाणी साचले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले, याची तातडीने दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. त्यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून या विषयीची माहिती घेतली. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी तसेच विस्कळीत झालेली वाहतुक तातडीने सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. या काळात नागरीकांनी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. नागरीकांनी काळजी घ्यावी. तसेच येत्या पाच दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याअनुषंगाने राज्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सतर्क राहण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.

आज संध्याकाळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पुण्यात ३१ ठिकाणी झडपडीच्या घटना घडल्या आहेत. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक कोंडी झाली. 

खालील ३२ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या -

येरवडा, नागपुर चाळ, कोथरुड बस स्टँड, सिहंगड रोड, दामोदर नगर, शिवाजीनगर, सावरकर भवन, सहकार नगर, तावरे कॉलनी, सेनापती बापट रोड, गणेश खिंड रोड, ई स्क्वेअर , कोंढवा खुर्द, भैरवनाथ मंदिर, मार्केटयार्ड, संदेश नगर, कल्याणीनगर, गुरूनानक डेअरी येरवडा, सैनिक नगर, नवी पेठ, सुखसागर नगर, आई माता मंदिर, पर्वती दर्शन, शुक्रवार पेठ, मामलेदार कचेरी, विमाननगर, रास्ता पेठ, दारुवाला पुल, एरंडवणा, महादेव मंदिर, पद्मावती, ट्रेझर पार्क, खडकी, रेंजहिल चौक, भवानी पेठ, रामोशी गेट, खिलारेवाडी, जंगली महाराज रोड, वाकडेवाडी, पीएमसी कॉलनी, कोथरुड, करिश्मा सोसायटी, कोथरुड, मयुर कॉलनी, येरवडा क्षेत्रिय कार्यालय, विमानतळाजवळ  लोहगाव, पवार वस्ती धानोरी गोखलेनगर.

अतिप्रमाणात पाणी साचलेले परिसर -

पाषाण, बी यु भंडारी शोरूम जवळ , सिहंगड रोड दोन ठिकाणी, सेंट्रल मॉल समोर, नारायण पेठ, अष्ठभुजा मंदिर जवळ, खडकी, गुरुव्दाराजवळ, एरंडवणा, गणेशनगर, राजेन्द्र नगर, कसबा पेठ, कुभांर वाडा.

चंद्रकांत पाटलांचं आवाहन -

पुण्यातील पहिलाच पाऊस ढगफुटीसारखा झाला. पुण्यातील अनेक भागात पावसामुळे पाणी साचलं असून अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. महापालिकेची सगळी यंत्रणा कामाला लागली आहे. या ढगफुटी सदृश्य परिस्थितीत प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आपण काळजी करू नका. सगळ्या नुकसानाची नुकसानभरपाई केली जाणार आहे. नुकसान झाल्याची माहिती द्यायची असेल तर त्यांनी हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा, असं आवाहन  चंद्रकांत पाटलांनी पुणेकरांना केलं आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४