Pune rain update : पुणे जिल्ह्यात शनिवारी रात्री पासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ग्रामीण भागात मुसळधार पावसामुळे नद्या नाले ओसंडून वाहत आहेत. घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम असळून या ठिकाणी हवामान वविभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान, लोणावळा परिसरात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला असून गेल्या २४ तासांत २१६ मीमी पावसाची नोंद झाली आहे.
लोणावळ्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मागील २४ तासांत लोणावळ्यात तब्बल २१६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रेकॉर्डब्रेक पाऊस मागील २४ तासांत लोणावळ्यात झाला. लोणावळ्यात आलेल्या पर्यटकांना पावसात भिजण्याची चांगलीच संधी मिळाली. पावसामुळे लोणावळ्यात आल्हाददायक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आता पर्यटकांची पावले लोणावळ्यात वळू लागली आहेत. यावर्षीचा लोणावळा परिसरात रेकॉर्डब्रेक पाऊस झाला आहे. आत्तापर्यंत लोणावळ्यात १ हजार ४८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी आज पर्यंत १ हजार १९० मिलिमीटर पाऊस झाला होता.
पुण्यातील घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. भोर, वेल्हा भागात रात्री पासून १०० मिलिमीटरच्या वर पावसाची नोंद झाली आहे. तर मावळ आणि भीमाशंकर परिसरात २०० मिलिमीटरच्या वर पावसाची नोंद झाली आहे. भोर तालुक्यातील शिरगाव येथे १२१ मिलिमीटर, तर मुळशी हिरडोशी येथे देखील १२० मिलिमीटर, आणि भूतोंडे येथे १६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
वेल्हा तालुक्यात १२८ मिलिमीटर तर, गिसर येथे १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मावळ तालूक्यातील उजनी खंडाळा येथे २३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. भीमाशंकर व चासकमान खोऱ्यात २०८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पुण्यातील सिंहगड परिसरात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाय वाटेवर अतकरवाडी जवळ आज पहाटे दरड कोसळली आहे. त्यामुळे पर्यटक आणि गिर्यारोहकांनी सिंहगडाच्या पायवाटेने जाणे टाळावे असे आवाहंन वनविभागाने केले आहे. सिंहगड परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसणपसून जोरदार पाऊस कोसळत आहे. दरड कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या