Navi Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे नवी मुंबईत साचलं पाणी, राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट, VIDEO-heavy rainfall causes water logging in navi mumbai see video ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Navi Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे नवी मुंबईत साचलं पाणी, राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट, VIDEO

Navi Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे नवी मुंबईत साचलं पाणी, राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट, VIDEO

Aug 03, 2024 06:48 PM IST

Navi Mumbai Rain : आयएमडीने ६ ऑगस्टपर्यंत पालघर आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे व साताऱ्यात रेड अलर्ट जारी केला आहे.

नवी मुंबईत साचलं पाणी
नवी मुंबईत साचलं पाणी (PTI)

नवी मुंबईतील काही भागात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले होते. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने आज शहरासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेनेही समुद्रात उंच लाटां उसळण्याचा इशारा दिला आहे. एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता  महापालिकेने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

भरती: सकाळी ११:४७ वाजता - ४.२८ मीटर

ओहोटी: सायंकाळी ०५:५२ वाजता - १.७० मीटर

भरती: रात्री- ११:३७ वाजता - ३.६६ मीटर

ओहोटी: उद्या ०४.०८.२०२४ रोजी पहाटे ०५:३८ वाजता - ०. ७५ मीटर

आयएमडीने ६ ऑगस्टपर्यंत पालघर आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत यलो अलर्ट जारी केला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि साताऱ्यात अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले. यातच हवामान विभागाने राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असा अंदाज वर्तवला आहे. येत्या तीन ते चार तासांत पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

जुलैचा पाऊस आणि मान्सून हंगामाच्या उत्तरार्धात अपेक्षित पावसाबद्दल माध्यमांशी बोलताना आयएमडीचे महासंचालक एम. महापात्रा यांनी गुरुवारी सांगितले की, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 मध्ये देशभरात पाऊस सरासरीपेक्षा जास्त किंवा दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्क्यांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर ची दीर्घकालीन सरासरी ४२२.८ मिमी आहे.

ईशान्य आणि पूर्व भारताचा जवळचा भाग, लडाख, सौराष्ट्र, कच्छ आणि मध्य आणि दक्षिण भागातील काही तुरळक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो, जो दीर्घकालीन सरासरीच्या ९४ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

सप्टेंबरमध्ये अधिक पावसाच्या शक्यतेबद्दल विचारले असता ते म्हणाले की, एल निनो-सदर्न ऑसिलेशन (ईएनएसओ) तटस्थ परिस्थिती ला नीना परिस्थितीकडे सरकत असल्याने ऑगस्टपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातही आज पावसाच्या सरी कोसळतील.