मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Rain : मुंबई व उपनगरे तसेच ठाण्यासाठी पुढील दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट

Mumbai Rain : मुंबई व उपनगरे तसेच ठाण्यासाठी पुढील दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 17, 2022 11:42 AM IST

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार (IMD) आज व उद्या (१७ आणि १८ ऑक्टोबर) मुंबई शहर, उपनगरे तसेच ठाणे व कोकणात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार आहे.

दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट
दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट

Maharahtra Rain:राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांसह शहरवासीयांची दैना केली आहे. मुंबई-पुण्यासह ग्रामीण भागाला पावसाने झोडपून काढले आहे. या पावसाने काढणीला आलेल्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आता हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार (IMD) आज व उद्या (१७ आणि १८ ऑक्टोबर) मुंबई शहर, उपनगरे तसेच ठाणे व कोकणात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसणार आहे. आयएमडीकडून मुंबईला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईबरोबर ठाणे, रायगड, पालघरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

यावर्षी ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत माघारीच्या मान्सूनने राज्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. गेल्या दहा वर्षातील ऑक्टोबर महिन्यातील रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसात मान्सून महाराष्ट्रातून काढता पायघेण्याची शक्यता आहे.

शनिवारी सकाळी मुंबई २१६ मिमि पावसाची नोंद झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून राज्यातून लवकरच परतणार आहे.मान्सून परतण्यापूर्वी सोमवारी आणि मंगळवारी राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील अनेक भागात यलो अलर्ट जारी केला आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या