मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Rain Update: पुढील सहा तासांत या जिल्ह्यात पाऊस धो-धो बरसणार

Maharashtra Rain Update: पुढील सहा तासांत या जिल्ह्यात पाऊस धो-धो बरसणार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 16, 2022 09:44 AM IST

Rain update : कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडून महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असल्याने जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे पुढील पाच ते सहा तासांत राज्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज
राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे : कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडून महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असल्याने जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे पुढील पाच ते सहा तासांत राज्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, घाट क्षेत्रात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे या ठिकाणी वाहतूक खोळंबणे, डोंगरावरून दगड, माती घसरून येणे, झाडे पडणे आदी घटना घडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, ठाणे, कोकण परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पासून सुरू आहे. मुंबईत जोरदार पासून सूर असून याने ठिकाणी पाणी साचले आहे. पुण्यातही गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे. धरण परिसरात सुरू असलेल्या पवसामुळे धरणे तुडुंब भरली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. सातारा जिल्ह्यात कोयना धरण परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे कोयना धरणातून आज सकाळी १० वाजता धरणातून नदीपात्रात एकूण ४१ हजार ९५८ हजार क्युसेक्सने विसर्ग सुरू राहणार आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. विदर्भातही पावसाचा जोर कायम आहे. वर्धा, यवतमाळ, नागपुर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली मारठवाड्यातील काही जिल्ह्यात संतत धार पाऊस सुरू आहे.

कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडून महाराष्ट्राच्या दिशेने जात असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. आज सकाळपासून पावसाचा जर वाढला आहे. आता पुढील तीन ते चार तास मुसळधार पावासाचा अंदाज वर्तवल्यानं मुंबईकरांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

१६ आणि १७ सप्टेंबररोजी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ही परिस्थिती पुढील तीन ते चार दिवस राहील, अशी माहिती हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे. या पावसामुळे वाहतूक मंदावणे, झाडांची पडझड होण्यासारख्या घटना घडण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या