Pune Rain update : पुणे, मुंबईसह राज्यात अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुण्यात मध्यरात्री पासून जोरदार पाऊस सुरू आहे. थोड्या विश्रांतीनंतर आज सकाळ पासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्याच्या बहुतांश शहरी आणि ग्रामीण भागतात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. पुण्यात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच राज्याच्या बहुतांश भागात देखील पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात नैऋत्य मौसमी पावसाचे आगमन झाले असले तरी असून पूर्ण राज्य मॉन्सूनने अद्याप व्यापलेला नाही.
राज्यात पूर्वी मौसमी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला असल्याने तरकारी पिकांचे मोठे नुकसान झाले. उन्हाळी ज्वारी पिकाला देखील याचा मोठा फटका बसला. पुणे शहर आणि ग्रामीण भागात काल पासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. पुण्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती पुणे वेध शाळेने दिली आहे.
राज्यात शनिवार पासून अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काल पासून मुंबईत ढगाळ हवामान असून काही ठिकाणी पाऊस देखील झाला. दरम्यान, पेरणीपूर्वीची कामे लवकर आटोपून घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
महाराष्ट्रात गुरुवारी मॉन्सून दाखल झाला. राज्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापुरात मान्सून दाखल झाला असून या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. बऱ्याच जिल्ह्यात आज सकाळ पासून पाऊस सुरू आहे. येत्या ३ दिवसांत मान्सून मुंबईसह विदर्भ तसेच मराठवाड्याला व्यापणार असून त्यामुळे शनिवारपासून जोरदार पावसाजोर वाढणार आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज मुंबई, पुणे, ठाणे, पालघर व कोकणातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव तर विदर्भात अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.