Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या दोन दिवसांत जोरदार पाऊस पाडला आहे. सध्या मॉन्सून राज्यात प्रगती करण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. आजपासून पुढील काही दिवस कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच ते सात दिवस कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना रेड तर मुंबई, पुण्यासह पालघर रायगड जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या महितीनुसार, नैऋत्य मौसमी पावसाची उत्तरी सीमा कायम आहे. महाराष्ट्राच्या उर्वरित भागात पाऊस दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. समुद्र सपाटीवर असलेले द्रोणीय क्षेत्र आता दक्षिण महाराष्ट्र ते उत्तर केरळ पर्यंत आहे. पुढील पाच ते सात दिवस कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज कोकण गोव्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मेघगर्जना व विजांच्या कडकडाट सहित वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. २३ व २४ तारखेला कोकण गोव्यामध्ये ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात जोरदार तर मराठवाडा व विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २५ व २६ तारखेला कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रातील घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे . तसेच २६ तारखेला विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण गोव्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये २३ तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे २३ तारखेला सिंधुदुर्गला रेड अलर्ट दिलेला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे पुढील पाच दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. कोल्हापूर व सातारा येथे २३ ते २६ तारखेला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे व आजूबाजूच्या परिसरात पुढील दोन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या एक दोन सरी पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर आकाश सामान्यतः ढगाळ राहून अधून मधून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील ५ दिवसातील हवामानाच्या स्थितीबाबतच्या ताज्या इशाऱ्यात, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुण्यासह किमान ६ जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार पुण्यात २५ आणि ३६ जून दरम्यान ऑरेंज अलर्ट जारी केला. त्यासोबतच कोकण विभागातील ३ जिल्हे आणि दक्षिण महाराष्ट्रातील २ जिल्ह्यांनाही अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात, विशेषतः घाट भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने, हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचे पालन करण्याचा आणि प्रवास करताना आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी आयएमडीने या दोन्ही प्रदेशांसाठी यलो अलर्ट जारी केला होता. या ठिकाही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. तर २२ जून रोजी हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्र उपविभागातील ६ जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात सिंधुदुर्ग येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला असून रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर आणि सातारा येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.सध्याच्या हवामानाविषयी बोलताना, IMD, पुणे येथील वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ वैशाली खोब्रागडे म्हणाल्या, "आधी समुद्राच्या परिसरात असलेले वाऱ्याची चक्रिय स्थिती आता दक्षिण महाराष्ट्र ते उत्तर केरळ दरम्यान आहे. त्यामुळे मान्सूनचा प्रवाहही मजबूत होत आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्र उपविभागात २३ जून ते २६ जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने या विभागासाठी अद्ययावत इशारा जारी केला आहे त्याचवेळी मराठवाड्याचा काही भाग आणि संपूर्ण विदर्भात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. २३ ते २६ जून दरम्यान विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या