Ratnagiri Flood Update : कोकणात पावसाने कहर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांना बसला आहे. येथील नद्यांना पुर आला असून त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपुळून शहरात पुराचे पाणी घुसले आहे. यामुळे येथील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. तर जे नागरिक पुराच्या पाण्यात फसले आहेत. त्यांना एनडीआरएफच्या जवानांच्या साह्याने बाहेर काढले जात आहे. प्रमुक्याने रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात कोंड आंबेड-डिंगणी- कर्जुवे, धामणी, कसबा, फणसवणे भागात रस्त्यावर पाणी भरलेले आहे. तर खेड तालुक्यातील मोठा भाग हा जलमय झाला आहे.
कोकणात सुरू असलेल्या पावसाचा रत्नागिरीला जोरदार फटका बसला. पावसामुळे चिपळूण, खेड, राजापूरसह संगमेश्वर शहर परिसरात पाणी साचले आहे. येथील १७७ नागरिकांना एनडीआरएफच्या पथकाने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या पावसामुळे चिपळूणच्या महामार्गावर पाणी साचल्याने येथील वाहतूक ही संत गतीने पुढे जात आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील कोंड आंबेड-डिंगणी- कर्जुवे, धामणी, कसबा, फणसवणे भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने येथील वाहतूक ही बंद करण्यात आली होती. नागरिकांना सतर्क राहून सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. खेडच्या जगबुडी नदीने धोक्याची पटली ओलांडली आहे. दापोली मंडणगड या रस्त्यावर पालगड पवारवाडी पुलावरून पाणी गेले असून हा पूल देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मंडणगड येथील भारज नदीला पूर आला आहे. या नदीवरील चिंचगर मांदिवली पुलावरून पाणी वाहू लागले आहे.
खेड तालुक्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथील परिस्थिती पाहता पुणे येथून एन. डी. आर. एफ पथक या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. पावसामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावरील दिवाणखवटी, व्हीनेरे दरम्यान दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. जिह्यातील जगबुडी, वाशिष्ठी नदी, कोंदवली आणि मुचकुंदी नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.