नागपूर शहरात आज, सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाचा सर्वाधिक फटका नागपूर विमानतळ परिसराला बसला. नागपूर विमानतळाबाहेर पडणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण निर्माण झाली होती. जवळचं मेट्रो स्टेशन गाठण्यासाठी अनेक विमान प्रवाशांनी डोक्यावर बॅगा घेऊन पाण्यातून चालत वाट काढल्याचे दिसून आले.