मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Bhayander Fire : मुंबईत अग्नितांडव! भाईंदरमधील आझाद नगर झोपडपट्टीला भीषण आग, काहींचा मृत्यू

Mumbai Bhayander Fire : मुंबईत अग्नितांडव! भाईंदरमधील आझाद नगर झोपडपट्टीला भीषण आग, काहींचा मृत्यू

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 28, 2024 08:05 AM IST

Mumbai Bhayander Fire : मुंबईतील भाईंदर येथील आझाद नगर झोपडपट्टीला भीषण आग लागली असून बचाव कार्य सुरू आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली.

Mumbai Bhayander Fire
Mumbai Bhayander Fire

Mumbai Bhayander Fire : मुंबईत आगीच्या घटना सुरूच आहेत. आज सकाळी पहाटेच्या सुमारास भाईंदर येथील आझादनगर झोपडपट्टीत भीषण आग लागली. या घटनेत काही झोपड्या भस्मसात झाल्याची माहिती आहे. तसेच काही नागरिक देखील होरपळून जखमी झाले आहेत. तर काही नागरिकांचा मृत्यू झाल्याही भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी पोहचले असून बचाव कार्य सुरू आहे.

Maharashtra weather update : विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात आजही बरसणार; राज्यात पुढील काही दिवस असे असेल हवामान

भाईंदर पूर्वेकडील गोल्ड नेस्ट सर्कलजवळील आझाद नगर झोपडपट्टीत आग लागली आहे. आज सकाळी आझाद नगर झोपडपट्टीत काही झोपड्यांना अचानक आग लागली. आग वेगाने पसरल्याने भीषण रूप धारण केले आहे. या आगीत काही जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले आहे. ही आग नेमकी काशी लागली ही अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

 

Mumbai Bhayander Fire
Mumbai Bhayander Fire

मुंबईत आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ठाण्यातील अंबरनाथ येथील सर्कस ग्राउंड परिसरातील झोपडपट्टीला सोमवारी भीषण आग लागली होती. घरगुती सिलिंडरचा स्फोन झाल्याने ही आग लागली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. या आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

मुंबईच्या सांताक्रूझ पश्चिम येथील मिलान सबवेजवळील ऑप्शन्स कमर्शियल सेंटरला देखील सोमवारी संध्याकाळी आग लागली होती. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आणि गच्चीवर अडकलेल्या ३७ जणांना अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले होते.

WhatsApp channel

विभाग