Pune Vadgaon sheri Fire news : पुण्यातील वडगाव शेरी येथील सोपान नगर येथे एका भंगार गोदामाला सकाळी भीषण आग लागली. या आग एवढी भयंकर होती की आगीचे लोळ हे दूरपर्यन्त दिसत होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या तब्बल १५ गाड्या या घटनास्थळी रवाना झाल्या. या आगीचे कारण अद्याप समजले नाही. सुदैवाने या दुर्घटनेत जीवित हानी झाली नाही.
(1 / 5)
वडगावशेरीतील एका भंगार दुकानाला आग लागून संपूर्ण दुकान या आगीत भस्मसात झाले. गुरुवारी सकाळी ११.३० च्या सुमारात ही घटना घडली. (छायाचित्र/ हिंदुस्तान टाईम्स मराठी)
(2 / 5)
वडगावशेरीतील सोपाननगर भागातील विक्रम गलांडे यांच्या मालकीच्या जागेत भंगाराचे दुकान व मोकळे गोडवून असून यात अचानक आग लागल्याने संपूर्ण दुकानातील भंगार जळून खाक झाले. (छायाचित्र/ हिंदुस्तान टाईम्स मराठी)
(3 / 5)
यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र या आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाले. तब्बल दोन तासानंतर आग्निशमन दलाला ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. (छायाचित्र/ हिंदुस्तान टाईम्स मराठी)
(4 / 5)
तब्बल १५ अग्निशमन बंब, पाण्याचे टँकर यांच्या साहायाने ही आग आटोक्यात आणण्यात आली. आग लागलेल्या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती. (छायाचित्र/ हिंदुस्तान टाईम्स मराठी)
(5 / 5)
आग विझवण्यासाठी आग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी जाण्यासाठी मोठा अडथळा होत असल्याने स्थानिक चंदननगर पोलिसांनी बंदोबस्त देऊन गर्दी पांगविल्याने आग आटोक्यात आणण्यास मदत झाली. (छायाचित्र/ हिंदुस्तान टाईम्स मराठी)