Ambarnath hit and ran : राज्यात हीट अँड रन च्या घटना वाढल्या आहेत. या घटनेमुळे राज्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून अद्याप या घटना कमी झालेल्या नाहीत. अंबरनाथ येथे देखील मंगळवारी अशीच एक धक्कादायक घटना पुढे आली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. कौटुंबिक वादातून एका कार चालकाने नातेवाईक बसले असलेल्या दुसऱ्या कारला जाणीव पूर्वक जोरदार धडक दिली. ही गाडी पुढे गेल्यावर चालकाने ती पुन्हा वळवून कारला जोरदार धडक दिली. यावेळी रस्त्यावर असणाऱ्या पाच नागरिकांना करचालकाने फरफट नेले. सुदैवाने या घटनेत कुणी मृत्यूमुीखी पडले नाहीत. मात्र, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जुन्या कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना अंबरनाथ बदलापूर मार्गावर मंगळवारी झाली. या घटनेतील दोघे कार चालक हे नात्याने चुलत भाऊ असून ते मुंबईचे रहिवाशी आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबरनाथमधील जांभूळफाट्याजवळ मुख्य रस्त्यावर टाटा सफारी या एसयुव्हीने एका पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर कारचा पाठलाग करत तिला सुरुवातीला पाठीमागून जोरदार धडक दिली. फॉर्च्युनर ही गाडी रस्त्याच्या बाजूला उभी होती. सफारी पुढे गेल्याने चालकाने सफारी गाडी रस्त्यावरून वळवली. यावेळी येथे काही नागरिक उभे होते सफारी चालकाने त्यांचा कोणताही विचार न करता समोरून धडक दिली. यावेळी फॉर्च्युनरच्या मागे असलेले काही नागरिक गाडीखाली आले. यातील दोघा तिघांना गाडीने फरफटत नेलं. या घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले आहे. तर इतर इतर तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी काळ्या रंगाच्या सफारी गाडीवर दगडफेक करत चालकाला चोप दिला आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या कौटुंबिक वादातून आरोपीने हे कृत्य केल्याचं समजतं.
ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यात कारचालक दुसऱ्या गाडीला धडक देत नागरिकांना चिरडत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.