मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Worli Heat And Run : वरळीत 'हिट अँड रन'; भरधाव कारने महिलेला उडवले; जागीच मृत्यू, चालक फरार

Worli Heat And Run : वरळीत 'हिट अँड रन'; भरधाव कारने महिलेला उडवले; जागीच मृत्यू, चालक फरार

Jul 07, 2024 10:36 AM IST

Worli Heat And Run : मुंबईत वरळी येथे हीट अँड रनची घटना उघडकीस आली आहे. एका भरधाव कारने महिलेला उडवले असून यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना अॅट्रिया मॉलजवळ घडली.

वरळीत 'हिट अँड रन'; भरधाव कारने महिलेला उडवले; जागीच मृत्यू, चालक फरार
वरळीत 'हिट अँड रन'; भरधाव कारने महिलेला उडवले; जागीच मृत्यू, चालक फरार

Worli Heat And Run Accident : वरळी येथे येथे आज सकाळी हीट अँड रनची घटना उघडकीस आली आहे. मासळी बाजारातून मासे आणण्यासाठी गेलेल्या एका दाम्पत्याला एका भरधाव गाडीने उडवले. यात महिलेचा जागीच मृत्यू हाल आहे. तर तिचे पती जखमी झाले आहे. घटनेनंतर चालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना आज सकाळी ५.३० च्या सुमारास येथील अॅट्रिया मॉलजवळ घडली.

पुण्यात हीट अँड रनची घटना ताजी असतांना मुंबईत देखील आज सकाळी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरळी कोळीवाडा येथे राहणारे नाकवा हे दाम्पत्य सकाळी मासे खरेदीसाठी मुख्य बाजारात दुचाकीवरुन गेले होते. दोघांनीही ससून डॉकला जाऊन तेथून मासे खरेदी करून परत येत असतांना एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यावेळी त्यांच्याकडे मोठे सामान होते. दोघेही थेट दुचाकीसह भरधाव गाडीच्या बोनेटवर जाऊन पडले. यावेळी नवऱ्याने स्वत:ला बाजूला केले. मात्र, महिलेला भरधाव गाडीची जोरदार धडक बसली. ही धडक एवढी जोरदार होती की यात महिला ही गंभीर जखमी झाली. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

ट्रेंडिंग न्यूज

घटनेनंतर गडीचालकाने मदत न करता घटनास्थळांवरून पळ काढला. यावेळी महिला देखील बोनेटवर होती. त्याने महिलेला फरफटत नेले. महिलेला पतीने तातडीने मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात भरती केले. मात्र, उपचार करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी महिलेला मृत्यू झाल्याचे जाहिर केले.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येथ अपघात स्थळाची पाहणी केली. कार चालक फरार झाला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे. या साठी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या परिसरातील सीसीटीव्हीचा तपास करून चालकाचा शोध घेत आहेत.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर