वडिलांसोबत शाळेत जात असतांना काळाची झडप ! पुणे जिल्ह्यातील शिक्रापुर येथे भीषण अपघातात २ मुलांसह वडिलांचा मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  वडिलांसोबत शाळेत जात असतांना काळाची झडप ! पुणे जिल्ह्यातील शिक्रापुर येथे भीषण अपघातात २ मुलांसह वडिलांचा मृत्यू

वडिलांसोबत शाळेत जात असतांना काळाची झडप ! पुणे जिल्ह्यातील शिक्रापुर येथे भीषण अपघातात २ मुलांसह वडिलांचा मृत्यू

Jan 07, 2025 09:01 AM IST

Shikrapur Accident : पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर चाकण रोडवर भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन मुलांसह त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वडिलांसोबत शाळेत जात असतांना काळाची झडप ! पुणे जिल्ह्यातील शिक्रापुर येथे भीषण अपघातात २ मुलांसह वडिलांचा मृत्यू
वडिलांसोबत शाळेत जात असतांना काळाची झडप ! पुणे जिल्ह्यातील शिक्रापुर येथे भीषण अपघातात २ मुलांसह वडिलांचा मृत्यू

Shikrapur Accident : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे दुचाकी आणि डंपरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन चिमुकल्यांसह त्यांच्या वडिलांचा करुण मृत्यू झाला आहे. ही घटना शिक्रापूर चाकण मार्गावर पिंपळे जगताप या गावाजवळ घडली आहे. बाप लेकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हलहळ व्यक्त केली जात आहे.

गणेश संजय खेडकर (वय ३५ रा. पिंपळेजगताप ता. शिरूर )तन्मय गणेश खेडकर (वय ९) आणि शिवम गणेश खेडकर (वय ५)अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. ही घटना सोमवारी घडली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी ट्रक चालक ज्ञानेश्वर जीवन रणखांब (वय ३५ रा. सोनेगाव, उस्मानाबाद ) याला अटक केली असून त्याच्यावर अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कसा झाला अपघात ?

पोलिसांनी दिलेली माहीतीनुसार शिक्रापूर - चाकण महामार्गावर खेडकर हे त्यांच्या दोन मुलांना त्यांच्या दुचाकीवरून शाळेत सोडवण्यासाठी जात होते. यावेळी एक पशु खाद्य वाहून नेणाऱ्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे तिघेही खाली पडले. त्यांच्या अंगावरून डंपर गेल्याने तिघांचाही मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी डंपरचालकाला अटक केली. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको करत या मार्गावरील बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न मांडला.

शिक्रापूर चाकण मार्गावर अपघात वाढले

शिक्रापूर चाकण मार्ग हा जिल्ह्यातील महत्वाचा मार्ग आहे. हा मार्ग चाकण, तळेगाव व शिरूर तालुक्यातील औद्योगिक वसाहतींना जोडतो. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक केली जाते. ही वाहतूक करतांना वाहतूक नियमांची पायमल्ली केली जात आहे. तसेच हा रस्ता देखील नादुरुस्त आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून हे खड्डे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे या मार्गावर पोलीसांनी गस्त वाढवून बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर