Palghar Teacher Death : पालघर येथील मनोर येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. या विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप देण्यात येत होता. यावेळी व्यासपीठावर असतांना राष्ट्रगीत म्हणत असतांना अचानक हृदय विकाराचा झटका आल्याने एका शिक्षकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
संजय लोहार असे या शिक्षकाचे नाव आहे. हृदयविकाराच्या झटका आल्याने ते व्यासपीठावर कोसळले. विद्यार्थ्यांनी व शाळेतील इतर शिक्षकांनी त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. मिळालेल्या माहितीनुसार पालघर तालुक्यातील मनोर येथे ४ फेब्रुवारी रोजी लालबहादूर शास्त्री विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभाचे आयोजन केले होते.
यावेळी ज्या शाळेने घडवले त्या शाळेतील शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुळे त्यांच्याशी संवाद साधत होते. शाळेतील शेवटचा दिवस असल्याने विद्यार्थी गहिवारून आले होते. तर शिक्षक त्यांना धीर देत होते. यावेळी शिक्षक संजय लोहार यांनी देखील विद्यार्थ्यांणा मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठि शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी व शिक्षकांची मनोगत झाल्यावर राष्ट्रगीत सुरू करण्यात आले. राष्ट्रगीत सुरू असतानाच लोहार यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व ते व्यासपीठावर खाली कोसळले.
शिक्षक लोहार खाली कोसळल्यामुळे कार्यक्रमात गोंधळ उडाला. मुलांनी व विद्यार्थ्यांनी त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. लोहार हे १९९७ साली एचएससी, डी. एड. करून या शाळेत रूजू झाले होते. ते मूळचे विक्रमगड येथील रहिवासी आहेत. त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे ते मुलांमध्ये आणि शाळेमध्ये सर्वांचे आवडते होते. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत ते विशेष लक्ष द्यायचे. तसेच सामाजिक उपक्रमात देखल ते पुढे असायचे. शाळेत शिकवत असतांना देखील त्यांनी पुढील शिक्षण सुरू ठेवले. या दरम्यान त्यांनी बीए, बी.एड. पूर्ण केले. सध्या ते शाळेत पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते.
संबंधित बातम्या