मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  दारूच्या दुकानांसमोर आता 'आरोग्य तरूणाईचे वैभव महाराष्ट्राचे' बॅनर लागणार, आरोग्य मंत्र्यांची घोषणा

दारूच्या दुकानांसमोर आता 'आरोग्य तरूणाईचे वैभव महाराष्ट्राचे' बॅनर लागणार, आरोग्य मंत्र्यांची घोषणा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 08, 2024 11:51 PM IST

Tanaji Sawant : तरुणाई वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनांच्या अधीन होत आहे.त्यामुळे "आरोग्य तरुणाईचे,वैभव महाराष्ट्राचे" हे अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

राज्यातील बिअर बार, वाईन शॉप व दारुच्या दुकानांसमोर आरोग्य तरूणाईचे वैभव महाराष्ट्राचे असे फलक लावले जाणार आहेत. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य खात्याला याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरुण पिढीमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

सध्याच्या स्पर्धेच्या युगात अपयशी ठरल्यानंतर तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. त्यांचे प्रबोधन करण्यासाठी राज्यातील प्रत्येक बियर बार समोर 'आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे'  अशा आशियाचे फलक लावा अशा सूचना राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. 

धाराशीवमध्ये शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात ५० खाटांचे सी सी यू, आय पी एच एल प्रयोगशाळा आणि डीईआयसी फेझ २ कामांचे भुमिपुजन डॉ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री ते बोलत होते.

सावंत म्हणाले की, यापूर्वी जागरूक पालक, सुदृढ बालक, माता सुरक्षित तर घर सुरक्षित आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तसेच प्रधानमंत्री आयुष्यमान योजना आणि आभा कार्ड अशा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी राज्य शासन घेत आहे. सध्या तरुणाई वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनांच्या अधीन होत आहे.  त्यामुळे "आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे" हे अभियान राबविण्यात येणार आहे.

 तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी जनजागृती करण्याची मोहीम राबविण्याबाबत आरोग्य यंत्रणेला प्रा.डॉ.सावंत यांनी निर्देश दिले. राज्यातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी लवकरच नागरिकांसाठी "राईट टू हेल्थ " कायदा आणणार असल्याचे प्रतिपादन सावंत यांनी केले.

WhatsApp channel