Burger King news : पुण्यातील रेस्टॉरंटला ‘बर्गर किंग’ हे नाव वापरता येणार नाही, उच्च न्यायालयाचे आदेश-hc temporarily restrains pune eatery from using the name burger king ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Burger King news : पुण्यातील रेस्टॉरंटला ‘बर्गर किंग’ हे नाव वापरता येणार नाही, उच्च न्यायालयाचे आदेश

Burger King news : पुण्यातील रेस्टॉरंटला ‘बर्गर किंग’ हे नाव वापरता येणार नाही, उच्च न्यायालयाचे आदेश

Aug 27, 2024 10:10 AM IST

Bombay High Court on Burger King Trademark Case: येत्या ६ सप्टेंबरपर्यंत पुण्यातील रेस्टॉरंटला बर्गर किंग हे नाव वापरण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे.

पुण्यातील रेस्टॉरंटला बर्गर किंग हे नाव वापरण्यास स्थगिती
पुण्यातील रेस्टॉरंटला बर्गर किंग हे नाव वापरण्यास स्थगिती (HT_PRINT)

Trademark Suit: बर्गर किंगच्या नावावरून पुण्यातील रेस्टॉरंट आणि आंतरराष्ट्रीय फास्ट फूड चेन यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत नवे वळण आले आहे. याआधी कनिष्ठ न्यायालयाने पुण्यातील रेस्टॉरंटच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले. याप्रकरणी ६ सप्टेंबर २०२४ रोजी होणाऱ्या सुनावणीपर्यंत पुण्यातील रेस्टॉरंटला ‘बर्गर किंग’ हे नाव वापरता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

ट्रेडमार्कचे उल्लंघन केल्याप्रकरणी नेमसेक रेस्टॉरंटविरुद्ध दाखल दावा कनिष्ठ न्यायालयाने फेटाळून लावण्याच्या निर्णयाला अमेरिकन कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अमेरिकन कंपनीने दाखल केलेल्या याचिकेची न्यायमूर्ती अनिल चांदूरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने सोमवारी दखल घेतली. याप्रकरणी येत्या ६ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मात्र, तोपर्यंत पुण्यातील रेस्टॉरंटला बर्गर किंग हे नाव वापरण्यास बंदी घालण्यात आली.

कनिष्य न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव

पुण्यातील रेस्टॉरंटला बर्गर किंग हे नाव वापरण्यापासून रोखण्यात यावे, असा दावा अमेरिकन फास्ट-फूड कंपनीने कनिष्ठ न्यायालयात केला होता. या नावामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होत असून कंपनीचे मोठे नुकसान होत आहे. याशिवाय, आमच्या प्रतिष्ठेलाही धक्का पोहोचत असल्याचे अमेरिकन फास्ट- फूड कंपनीने म्हटले. मात्र, कनिष्ठ न्यायालयाने अमेरिकन फास्ट- फूड कंपनीचा दावा फेटाळत पुण्यातील रेस्टॉरंट बर्गर किंगच्या भारतातील पहिल्या आऊटलेटच्या अनेक वर्ष आधी म्हणजेच १९९२ पासून सुरू असल्याचे स्पष्ट केले.

६ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी

अनाहिता इराणी आणि शापूर इराणी यांच्या मालकीचे रेस्टॉरंट १९९२ पासून सुरू असून ते प्रसिद्ध देखील आहे. परंतु, तक्रारदार अमेरिकन कंपनी पुण्यातील आमची लोकप्रियता हिसकावून घेत आहे. मुळात बर्गर किंग कॉर्पोरेशनसारखी जगभरात दबदबा असलेली कंपनी आम्हाला का घाबरत आहे? असा युक्तिवाद नेमसेक रेस्टॉरंटच्या वतीने सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी करण्यात आला. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयानंतर पुण्यातील रेस्टॉरंटने बर्गर किंग हे नाव वापरण्यास सुरुवात केली. यानंतर अमेरिकन फास्ट-फूड कंपनीने कनिष्ट न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. याप्रकरणी ६ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असून तोपर्यंत पुण्यातील रेस्टॉरंटला बर्गर किंग हे नाव वापरण्यात बंदी घालण्यात आली.

विभाग