Mumbai vegetable sellers mothers son became CA : राज्यात खोटे प्रमानपत्र सादर करून आयएएस अधिकारी बनलेल्या पूजा खेडकर यांची चर्चा सुरू असतांना मुंबईत एका भाजीविक्रेत्याच्या मुलाने सीए परीक्षेत यश मिळवून आईचे पांग फेडले आहे. या मुलाने सीए पास झाल्याची बातमी घेऊन भाजी विकणाऱ्या आईकडे जात ही आनंदाची बातमी आईला दिली. मुलाची यशोगाथा ऐकून आईचा आनंद गगनात मावेनासा झाला. आईंनं हातातील काम सोडून थेट मुलाला मिठी मारली व तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. दोघांच्या या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण पाहून माय-लेकाचं अभिनंदन केले आहे.
डोंबिवलीमध्ये ही महिला भाजी विक्रीचा व्यवसाय करते. मुलगा सी.ए. परीक्षा पास झाल्याची बातमी घेऊन येताच आईने मुलाला घट्ट मिठी मारली. यावेळी आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले व मुलाच्या यशाने तिचे ऊर भरून आले. मुलाने आईच्या कष्टाचे चीज केले आहे. जिद्द आणि परिश्रामच्या बळावर या मुलाने हे यश मिळवले आहे. योगेश असे या ही शिकवण मुंबईतील योगेश सर्वांना देत आहे. एका भाजी विक्रेत्याचा मुलगा सीए झाल्यानंतर जेव्हा आपल्या आईला भेटला तेव्हा दोघांनाही अश्रू अनावर झाले आहे. योगेश ठोंबरे असे या मुलाचे नाव आहे. त्याचा व त्याच्या आईचा ग भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
११ जुलै रोजी भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेने सीए परीक्षेचा निकाल जाहिर केला. या परीक्षेत डोंबिवली येथील एका भाजीविक्रेत्याचा मुलगा योगेश ठोंबरे याने सीए परीक्षेत उत्तीर्ण होत आई वडिलांच्या कष्टाचंन चीज केलं. दोघांच्या या भेटीचा हृदयस्पर्शी व्हिडिओ राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री रवींद्र चव्हाण यांनी एक्सवर शेअर करत “योगेश, तुझा अभिमान आहे. डोंबिवली पूर्वेतील गांधीनगर येथील गिरनार मिठाई दुकानाजवळ भाजी विकणारे ठोंबरे मावशी यांचा मुलगा योगेश चार्टर्ड अकाउंटंट (सीए) झाला आहे. बळ, जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर योगेशने खडतर परिस्थितीतही हे शानदार यश मिळवले आहे. त्याच्या यशाबद्दल त्याच्या आईचे आनंदाश्रू लाखमोलाचे आहेत. सीए सारखी खडतर परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या योगेशचे फारसे कौतुक करावे तेवढे कमी आहे. एक डोंबिवलीकर म्हणून मला योगेशच्या यशाबद्दल आनंद आहे. अभिनंदन योगेश! म्हणत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दोघांच्या गळाभेटच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ ३ लाखांपेश्रा जास्त नागरिकांनी पाहिला आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी भावुक कमेन्ट पोस्ट केल्या आहेत. दोघांचेही अभिनंदन करून माऊलीच्या कष्टाचे चीज झाल्याचे नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या