Anant Ambani-Radhika Merchant wedding: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी व त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी हे आज राधिका मर्चंटसोबत मुंबईत एका भव्य समारंभात विवाहबद्ध होणार आहे. लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम आणि लक्झरी भेटवस्तू देऊन राजेशाही वागणूक दिली जात आहे. या सोबतच अंबानी यांनी त्यांच्या रिलायन्सच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना देखील खास भेटवस्तू दिली आहे. त्यांना एक गिफ्ट बॉक्स देण्यात आला असून यात विविध वस्तूंची भेट त्यांना दिली आहे.
रिलायन्सच्या अनेक कर्मचाऱ्यांनी आज १२ जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या शाही लग्नसोहळ्यापूर्वी मिळालेल्या गिफ्ट बॉक्सचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केले आहे. हे व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. लाल रंगाच्या या गिफ्ट बॉक्समध्ये सोनेरी अक्षराने लिहिले आहे की, “देवाच्या कृपेने आमच्या देवी आणि देवता, आम्ही अनंत आणि राधिकाचे लग्न साजरे होत आहे. नीता आणि मुकेश अंबानींना यांच्याकडून शुभेच्छा.”
या बॉक्सच्या आत हल्दीरामच्या नमकीनची चार पाकीटे, मिठाईचा बॉक्स आणि एक चांदीचे नाणे आहे. नमकीनच्या पॅकेटमध्ये हल्दीरामची आलू भुजिया शेव आणि लाइट चिवडा ही पाकीटं आहेत.
तान्या राज नामक एका सोशल मीडिया यूझरने गिफ्ट बॉक्सचा व्हिडिओ आणि फोटो शेअर करत “रिलायन्समध्ये काम करण्याचे फायदे,” असे लिहिले आहे.
नीता आणि मुकेश अंबानी यांनी त्यांच्या लहान मुलाच्या लग्नापूर्वी ५० वंचित जोडप्यांचा सामूहिक विवाह देखील केला होता. हा विवाह देखील मोठ्या थाटात करण्यात आला होता. या जोडप्यांना अंबानींकडून सोन्या-चांदीचे दागिने, किराणा सामान आणि इतर घरगुती वस्तूंस १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला होता.
दरम्यान, अनेक पाहुण्यांनी यापूर्वी त्यांना मिळालेल्या लग्झरी लग्नाच्या आमंत्रणाचे फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केले होते. अनंत आणि राधिकाचे लग्न आज १२ जुलै रोजी होणार आहे. तर १५ जुलै रोजी रिसेप्शन होणार आहे. या साठी जगभरातील बडे नेते सेलिब्रेटींना आमंत्रण देण्यात आले आहेत. या पाहुण्यांना देखील चांदीचे मंदिर, एक खास शाल आणि बरेच काही देण्यात आले आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्याची सुरुवात मार्चमध्ये तीन दिवसांच्या भव्यदिव्य कार्यक्रमाने झाली. जामनगरमध्ये झालेल्या या सोहळ्यात रिलायन्स इस्टेटमध्ये अनेक बडी मंडळी आली होती. यात प्रसिद्ध गाईका रिहानाची रंगलेली मैफिल आकर्षण ठरले. यानंतर दिलजीत दोसांझ यांनी सादर केळल्या परफॉर्मन्सने सर्वांची मने जिंकली.
जामनगरमधील उत्सवानंतर लंडनमधील वधू-वरांच्या मित्रांसाठी खाजगी पार्ट्यांचे देखील आयोजन करण्यात आले होते. जूनच्या सुरुवातीला, अंबानी कुटुंबाने शेकडो पाहुण्यांसाठी इटली आणि फ्रान्समध्ये लक्झरी क्रूझ पार्टीचे आयोजन केले होते. गेल्या आठवड्यात लग्नाच्या धावपळीत, अंबानी कुटुंबाने संगीत (जस्टिन बीबरच्या परफॉर्मन्ससह), मामेरू समारंभ, गरबा रात्री, हळदी आणि काल मेहेंदी समारंभ आदी कार्यक्रम आयोजित केले आहेत.
संबंधित बातम्या