मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  H3N2 Influenza Virus: महाराष्ट्राची चिंता वाढली! राज्यात 'एच३ एन२’ एन्फ्लूएन्झा व्हायरसचा दुसरा बळी

H3N2 Influenza Virus: महाराष्ट्राची चिंता वाढली! राज्यात 'एच३ एन२’ एन्फ्लूएन्झा व्हायरसचा दुसरा बळी

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 15, 2023 10:17 AM IST

'एच३ एन२’ एन्फ्लूएन्झा व्हायरसचा संसर्ग झाल्याने अहमदनगर पाठोपाठ नागपूर येथेही एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Virus
Virus (AFP)

H3N2 Influenza Virus In Maharashtra: चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना महामारीची लाट ओसरल्यानंतर महाराष्ट्रासमोर नवं संकट येऊन उभं ठोकलं आहे. राज्यातील'एच३ एन२’ व्हायरसचा संसर्ग झाल्याने नागपूर येथील ७८ वर्षाच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. अहमदनगर पाठोपाठ नागपुरात'एच३ एन२’ एन्फ्लूएन्झा व्हायरसचा दुसरा बळी ठरला आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. तसेच ‘डेथ ऑडिट’ झाल्यानंतरच या मृत्यूची नोंद होणार असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महाराष्ट्रातील 'एच३ एन२’ एन्फ्लूएन्झा व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अहमदनगर येथील एक तरुण एच३ एन२ व्हायरसमुळे दगावल्याची माहिती समोर आली. यानंतर नागपुर येथील एका रुग्णाचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्याला मधुमेहासह इतर उच्चरक्तदाबाचा त्रास होता.

या रुग्णाची 'एच३ एन२’ तपासणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या व्हायरसमुळे रुग्णाचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने डेथ ऑडिट झाल्यानंतरच मृत्यूची नोंद H3N2 चा मृत्यू म्हणून करणार असल्याचं स्पष्ट केलंय. मात्र, या रुग्णाच्या मृत्युमुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.

IPL_Entry_Point

विभाग