"अर्थ खात्यासारखे नालायक खातं नाही"; शिंदे गटातील मंत्र्याचे अजित पवारांबाबत धक्कादायक विधान-gulabrao patil controversial statement about finance department and ajit pawar over file rejection ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  "अर्थ खात्यासारखे नालायक खातं नाही"; शिंदे गटातील मंत्र्याचे अजित पवारांबाबत धक्कादायक विधान

"अर्थ खात्यासारखे नालायक खातं नाही"; शिंदे गटातील मंत्र्याचे अजित पवारांबाबत धक्कादायक विधान

Sep 06, 2024 08:19 PM IST

gulabraopatil On Ajit pawar : पाणी पुरवठा विभागाच्या फाईल वारंवार पाठवूनही परत पाठवण्यात आल्याचं सांगत गुलाबराव पाटील यांनी अर्थखाते हे सर्वात नालायक खाते आहे,असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.

 शिंदे गटातील मंत्र्याचे अजित पवारांबाबत धक्कादायक विधान
शिंदे गटातील मंत्र्याचे अजित पवारांबाबत धक्कादायक विधान

Gulabrao Patil on Finance department : लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गट व शिंदे गटामध्ये कलगीतुरा रंगला असतानाच आता राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao patil) यांनी अजित पवारांच्या (ajit pawar) अर्थखात्याबाबत उघड नाराजी व्यक्त केल्याने महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचं समोर आले आहे. पाणी पुरवठा विभागाच्या फाईल वारंवार पाठवूनही परत पाठवण्यात आल्याचं सांगत गुलाबराव पाटील यांनी अर्थखाते हे सर्वात नालायक खाते आहे,असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या प्रसारावरून शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता गुलाबराव पाटील यांनी थेट अर्थमंत्रालयावर टीका केल्याने महायुतीतील वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. जळगाव येथे शुक्रवारी हातपंप आणि वीजपंप दुरुस्ती आणि देखभाल कर्मचारी संघटनेच्या वतीने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्याबाबत आपल्या उद्विग्न भावना व्यक्त केल्या.

अर्थ खात्यासारखे नालायक खाते नाही. अनेक वेळा नकाराचा शेरा मिळून फाईल परत येत असे. पणमात्र मी पण पाठपुरावा सोडला नाही. त्यामुळे आमचे काम झाले. दोन अडीच महिन्यात येणारे विघ्न दूर करण्यासाठी प्रयत्न करा. स्वार्थाबरोबर परमार्थही साधावा लागतो," असं विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं.

 

गुलाबराव पाटील म्हणाले की, सरकारमध्ये राज्यमंत्र्याला फारसे काही करुन घेता येत नाही. उद्धव ठाकरे सरकारमध्ये मी पाणी पुरवठा खाते मागितले नव्हते. मंत्र्याने आपल्या खात्यातील कर्मचाऱ्यांना खुश ठेवले तरच चांगले काम होऊ शकते. आमदार जर मंत्री होऊ शकतो तर, उपअभियंत्यास वरची जागा का मिळू नये.  मी माझ्या खात्यातील अनेकांना पदोन्नती दिली. माझ्यासारखा पदोन्नती देणारा दुसरा कोणी नसेल. जनतेला पाणी पाजण्याचे पुण्याचे काम मला मिळाले. आयुष्यात आता लोकांसाठीच काम करायचे आहे, असेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

Whats_app_banner