मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  गुजरातची मच्छिमार नौका रत्नागिरीजवळ समुद्रात बुडाली; दोघांचा मृत्यू, एक बेपत्ता

गुजरातची मच्छिमार नौका रत्नागिरीजवळ समुद्रात बुडाली; दोघांचा मृत्यू, एक बेपत्ता

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 04, 2023 08:52 PM IST

Gujarat fishing boat sink : रत्नागिरीजवळ गुजरातची मच्छिमार नौका बुडाल्याने दोन खलाशांचा मृत्यू झाला असून एकजण बेपत्ता झाला आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

रत्नागिरी – गुजरातमधील रत्नसागर नावाची मच्छिमार नौका रत्नागिरीजवळच्या खोल समुद्रात बुडाली आहे. रत्नागिरीपासून ८० नॉटिकल मैल समुद्रात ही दुर्घटना घडली. जलसमाधी मिळालेल्या नौकेतील खलाशांच्या मदत व बचावकार्यासाठी भारतीय तटरक्षक दलाकडून युध्दपातळीवर प्रयत्न करण्यात आले. मात्र नौकेतील दोन खलाशांचा मृत्यू झाला तर एक जण बेपत्ता आहे. कोस्टगार्डने चार जणांना सुखरुप बाहेर काढले आहे.

दोन खलाशांचे मृतदेह समुद्रातून बाहेर काढले आहेत. बचावलेल्या चार खलाशांना मिरकरवाडा बंदरात आणण्यात आले. लक्ष्मण वळवी आणि सुरेश वळवी अशी मृत्यू झालेल्या दोन खलाशांची नावे आहेत. मधुकर खटाळ हे बेपत्ता आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

गुजरातमधील रत्नसागर मच्छिमार नौका रत्नागिरीजवळ खोल समुद्रात मासेमारी करत असताना बुडाली. नौकेच्या मध्यभागातील लाकडाच्या फळीचा खिळा निखळल्यामुळे भगदाड पडून पाणी आत घुसले आणि नौका पलटी झाली. खलाशांनी जवळच्या नौकांना मदतीसाठी बोलावले. त्यानंतर अन्य नौकांनी खलाशांना वाचवले. बुडालेल्या तीन खलाशांचा शोध कोस्टगार्डने घेतला. त्यापैकी दोघांचे मृतदेह सापडले. एकजण अद्याप बेपत्ता आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या