Ahmedabad-Vadodara Expressway Accident: अहमदाबाद बडोदा एक्सप्रेस वेवर पुण्याला निघालेल्या बसला भरधाव टँकरने धडक दिली. या धडकेनंतर बस रस्त्यावर असलेल्या रेलिंगला तोडून २५ फूट खाली कोसळली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृ्त्यू झाला. अपघातग्रस्त बसमधून २० हून अधिक जण प्रवास करत असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस अहमदाबादहून पुण्याला निघाली होती. या बसमध्ये एकूण २३ प्रवासी होते. मात्र, अहमदाबाद बडोदा एक्सप्रेस वेवर सीमेंट टँकरने बसला जोरदार धडक दिली. यानंतर बस रस्त्याच्या कडेचे रेलिंग तोडून २५ फूट खाली कोसळली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तसेच बेदरकारपणे वाहन चालवणे आणि अपघाताला कारणीभूत ठरल्या प्रकरणी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. टँकर चालकाने अचानक गाडी वळवल्याने हा अपघात झाला, असा आरोप करण्याता आला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
संबंधित बातम्या