सावधान! GBS राज्यात पासरतोय पाय; पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगलीत आढळले रुग्ण, 'इतक्या' जणांना लागण
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सावधान! GBS राज्यात पासरतोय पाय; पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगलीत आढळले रुग्ण, 'इतक्या' जणांना लागण

सावधान! GBS राज्यात पासरतोय पाय; पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगलीत आढळले रुग्ण, 'इतक्या' जणांना लागण

Jan 30, 2025 01:26 PM IST

GBS outbreak Sangli : राज्यात गुलेन बेरी आजाराचे रुग्ण वाढत आहे. पुणे, कोल्हापूर नंतर आता सांगलीमध्ये जीबीएस रुग्ण आढळले आहे. पुण्यात जीबीएसची रुग्णसंख्या १२७ वर पोहोचली आहे.

सावधान GBS राज्यात पासरतोय पाय! पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगलीत आढळले रुग्ण, 'इतक्या' जणांना लागण
सावधान GBS राज्यात पासरतोय पाय! पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगलीत आढळले रुग्ण, 'इतक्या' जणांना लागण

GBS outbreak Sangli : पुण्यात गुलेन बॅरे सिड्रोम आजार पाय पसरत आहे.  या दुर्मिळ जीबीएस आजाराने पुण्यात  थैमान घातले आहे. पुनयानंतर  कोल्हापूरात या आजाराचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर आता जीबीएसने  सांगलीतदेखील  शिरकाव केला आहे. सांगलीत गुरुवारी  जीबीएसबाधित ३  रुग्ण आढळून आले असून  जिल्हयातील रुग्णसंख्या ६ वर पोहोचली आहे. त्यांच्यावर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून  नागरिकांनी घाबरू नये  तसेच योग्य काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.  

सांगलीत  एक तर ग्रामीण भागात ५  असे ६ गुलेन बॅरी सिंड्रोम बाधित रुग्ण अढळले आहेत. हे रुग्ण आष्टा (ता.वाळवा), विटा (खानापूर) व नेलकरंजी (आटपाडी) येथील आहेत. त्यांच्यावर  शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.  हे रुग्ण सापडल्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून जिथे रुग्ण आढळले आहे, त्या परिसरात सर्वेक्षण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शरातील चिंतामणीनगर व आदी परिसरात  घरांचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व्हेक्षण केले आहे. येथील पाण्याचे नमुने देखील तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत.   चिंतामणीनगर मध्ये एका रूग्णाला जीबीएसचे लक्षणे आढळल्यावर त्याची तपासणी करण्यात आली असून तो बाधित असल्याचे आढळले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी दिली,   नागरिकांनी काळजी न करता पाणी उकळून प्यावे तसेच  स्वच्छता राखावी असे आवाहन  करण्यात आले आहे.  

पुण्यात महिलेचा मृत्यू 

पुण्यातील गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराने एका महिलेचा मृत्यू झाला.  ही महिला सिंहगड रोड येथील रहिवासी असून तिचे वय ५६ आहे. तिच्यावर ससून सामान्य रुग्णालयात (एसजीएच) उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान, या महिलेचा  मृत्यू झाला आहे. राज्यातील हा दुसरा संशयित जीबीएस मृत्यू आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदोशी येथे राहणाऱ्या महिलेला १५ जानेवारी रोजी मुंग्या येणे आणि चारही अंगात अशक्तपणाची लक्षणे दिसली. १७ जानेवारीरोजी एसजीएचमध्ये दाखल होण्यापूर्वी तिने सुरुवातीला जवळच्या खासगी आरोग्य केंद्रात उपचार घेतले. २८ जानेवारी रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही महिला  गोऱ्हे बुद्रुक येथे गेली होती. तसेच ती  कॅन्सरग्रस्त होती. पाच वर्षांपूर्वी तिच्यावर तोंडाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मृत्यूच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे.  आरोग्य विभागाने बुधवारी पुणे जिल्ह्यात १६ नव्या संशयित जीबीएसरुग्णांची नोंद केली. यापैकी ७२ रुग्ण ांना जीबीएस ची पुष्टी झाली आहे, अशी माहिती आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली.

पुण्यात २० रुग्ण व्हेंटिलेटरवर

एकूण रुग्णांमध्ये मनपा क्षेत्रातील २३, मनपा हद्दीतील नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील ७३, पिंपरी-चिंचवडमधील १३, पुणे ग्रामीण भागातील ९ आणि इतर जिल्ह्यातील ९ रुग्णांचा समावेश आहे. सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यातील विविध रुग्णालयात १२७ संशयित व खात्रीशीर जीबीएस रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, तर १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर