मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  GST Raid on Bullion Shop : संभाजीनगरमध्ये जीएसटी विभागाची छापेमारी, सराफा दुकानांवर कारवाई
GST Raid
GST Raid

GST Raid on Bullion Shop : संभाजीनगरमध्ये जीएसटी विभागाची छापेमारी, सराफा दुकानांवर कारवाई

11 March 2023, 16:41 ISTShrikant Ashok Londhe

Gst department raids : जीएसटीच्या वसुली पथकाने संभाजीनगरमधील एका सराफा दुकानावर छापा टाकला असून दुकानाच्या व्यवहाराची तपासणी केली जात आहे. शुक्रवारी दुपारपासून जीएसटी अधिकारी दुकानात ठाण मांडून असल्याचे वृत्त आहे.

केंद्र सरकारच्या दोन संस्था जीएसटी व ईडी एकाचवेळी महाराष्ट्रात कार्यरत असल्याचे दिसून आले. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर ईडीने आज छापेमारी केली आहे. यावरून राजकारण तापलं असतानाच आता संभाजीनगर शहरातील एका सराफा दुकानावर जीएसटीच्या वसुली पथकाने छापा  टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. काल (शुक्रवार) दुपारी सुरु झालेली छापेमारीची कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरुच असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

छत्रपती संभाजीनगर शहरातील एका सराफा व्यावसायिकावर जीएसटी विभागाच्या वसुली पथकाने शुक्रवारी छापा घातला. शुक्रवारी दुपारी एक वाजेपासून रात्री उशिरापर्यंत कर विभागाचे पथक दुकानात तपास करीत होते. दुकानातील कर्मचाऱ्यांना या वेळेत दुकानातच थांबवून ठेवण्यात आले होते. तर आजही दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच आहे. बाफना ज्वेलर्स असं कारवाई करण्यात आलेल्या सराफा दुकानाचे नाव आहे. 

मार्च अखेर असल्याने सर्वच करवसुली यंत्रणा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरातील बाफना ज्वेलर्स जीएसटीच्या रडारवर आले आहे. जालना रोडवरील बाफना ज्वेलर्स या सराफा दुकानावर जीएसटीच्या वसुली अधिकाऱ्यांनी छापा टाकला. मिळालेल्या वृत्तानुसार शुक्रवारी दुपारी एक नंतर सुमारे १० तास तपास अधिकाऱ्यांनी दुकानातील व्यवहारांची चौकशी केली. त्यानंतर पथकाने आज पुन्हा चौकशी सुरू केली असून सर्व कर्मचारी आणि व्यवस्थापकांना दुकानातच थांबवण्यात आले आहे. एकाच दुकानाची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी सुरू असल्याने अन्य व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

कर चोरीप्रकरणी जीएसटीच्या वसुली पथकाने ही कारवाई केल्याचे समजते. कारवाई दरम्यान दुकानातील सर्व फोन बंद करण्यात आले होते. पथकाने दुकानाचे सर्व खरेदी-विक्री व्यवहार तपासले. मात्र या कारवाईबाबत जीएसटी विभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.  

 

विभाग